राधानगरी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातानं (accident)कोल्हापूर हादरलं आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे भीषण अपघात झाला असून एकाच गावातील तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. बोलेरो आणि ट्रकची जोरदार धडक बसली आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे.
निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात (accident) झाला. अपघातात सोळांकुर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर झाले आहेत. भीषण अपघातात सोळांकुर गावातील शुभम चंद्रकांत धावरे (28), आकाश आनंदा परीट (23) आणि रोहन संभाजी लोहार (24) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एका बुलेरो गाडीला ट्रकनं धडक दिली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार एकाच गावातील तिन्ही तरूण जागीच ठार झाले. तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भीषण अपघातामुळं ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात ट्रक ड्रायव्हरनं भरधाव गाडी चालवत अपघात केला. अपघातानंतर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता त्यानं घटनास्थळावरुन पळ काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा:
लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये?, ‘या’ दिवशी येणार पैसे?
केसाला सुद्धा धक्का लागला तर पूर्ण जिल्हा पेटवून टाकू, काँग्रेस नेत्याचा धमकी वजा इशारा
भाजप आणि अजित पवार गटामध्ये २० जागांवर मतभेद: महायुतीत बंडखोरीची चिन्हे