कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून खबरदारीचा इशारा…

कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य (health) विभागाने पावसाळ्यात वाढणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, उलटी-जुलाब यासारख्या साथीच्या आजारांबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आरोग्य विभागाच्या सूचना:

  • पाणी शुद्धीकरण: पाणी किमान १० मिनिटे उकळून गाळून प्यावे. शक्य नसल्यास द्रव क्लोरीन टाकून पाणी शुद्ध करावे.
  • लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंध: डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्सीसायक्लिन औषध घ्यावे.
  • उलटी-जुलाब, तापाची लक्षणे दिसल्यास: त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • स्वच्छता: शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवावे. बाळांना जुलाब झाल्यास क्षारसंजीवनी द्यावी. परिसर स्वच्छ ठेवावा आणि पाणी साचू देऊ नये.
  • डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करावी: डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करून डेंग्यू, मलेरियाचा प्रसार रोखावा.
  • वैयक्तिक स्वच्छता: वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
  • ताप आल्यास डॉक्टरांकडे जावे: ताप आल्यास स्वतः औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • अन्न स्वच्छता: उघड्यावरचे अन्न, शिळे अन्न, कापून ठेवलेली फळे खाण्याचे टाळावे.

प्रत्येक नागरिकाने या सूचनांचे पालन करून साथीच्या आजारांपासून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य (health) विभागाने केले आहे.

हेही वाचा :

प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये खाणं आहे धोक्याचं, आरोग्यावर होतात दुष्परिणाम

अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

बार्बाडोस वादळानंतर रोहितची पत्नी रितिकाने केलेली पोस्ट का होतेय तुफान व्हायरल?