कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी (news) आहे, राज्य सरकारने कोल्हापुरात 100 नवीन इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी 9.86 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या नवीन बसेस प्रवाशांना आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा देतील.
कोल्हापुरातील पहिलं चार्जिंग स्टेशन
या बसेसच्या चार्जिंगसाठी कोल्हापुरातील (news) ताराबाई पार्कमध्ये स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यासाठी उच्च दाबाची वीज जोडणी आवश्यक आहे, ज्यात 11, 22 आणि 33 केव्ही क्षमतेच्या वीजजोडण्या दिल्या जाणार आहेत. एका बसला चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तास लागतात आणि एकदा चार्ज झाल्यानंतर ती बस 300 किलोमीटरचा प्रवास करू शकते.
राज्यातील इतर शहरांमध्येही होणार ई बसेसचे संचालन
मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आधीच ई बसेस सुरू झाल्या आहेत, आणि कोल्हापूरही लवकरच या यादीत सामील होणार आहे. या बसेससाठी 10 एसटी स्थानकांमध्ये 50 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरच्या प्रवाशांची मागणी पूर्ण
कोल्हापूरमधील विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले की, कोल्हापूरला 100 इलेक्ट्रिक बसेस मिळणे हे कोल्हापूरकरांसाठी मोठे यश आहे. या बसेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांची वाहतूक सोपी, जलद आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
हेही वाचा:
नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाची पहिली प्रतिक्रिया अखेर समोर
राजकारणातील मोठी बातमी; ‘या’ आमदाराने वाढवलं अजित पवारांचं टेंशन
शामी आणि सानिया मिर्झाच्या नव्या लूकने सोशल मीडियावर केला कहर!