कोलकात्याची अंतिम फेरीत धडक; क्वॉलिफायर-1 लढतीत हैदराबादचा धुव्वा 

कोलकाता नाईट रायडर्सने(kolkata knight riders) आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत क्वॉलिफायर-1 लढतीत सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवित आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. मिचेल स्टार्पच्या भन्नाट गोलंदाजीनंतर कर्णधार श्रेयस व व्यंकटेश या अय्यर बंधूंचे तुफान बघायला मिळाले. दोघांनीही दणकेबाज नाबाद अर्धशतके ठोपून कोलकात्याला रुबाबदार विजय मिळवून दिला. आयपीएलची दोन जेतेपदे जिंकणाऱया कोलकाताने चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.

हैदराबादकडून मिळालेले 160 धावांचे लक्ष्य कोलकात्याने 13.4 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 164 धावा करीत सहज पूर्ण केले. अहमानुल्लाह गुरबाझ (23) व सुनील नरेन (21) यांनी 3.2 षटकांत 44 धावांची सलामी देत कोलकात्याला (kolkata knight riders)आक्रमक सुरुवात करून दिली, मात्र हे दोघेही मोठी खेळी करू शकले नाही. टी. नटराजनने गुरबाझला, तर पॅट कमिन्सने नरेनला बाद केले. मात्र त्यानंतर व्यंकटेश अय्यर (नाबाद 51) व श्रेयस अय्यर (नाबाद 58) यांनी तिसऱया विकेटसाठी 44 चेंडूंत 97 धावांची अभेद्य भागीदारी करीत कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रेयसने 24 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांचा घणाघात केला, तर व्यंकटेशने 28 चेंडूंत 5 चौकारांसह 4 षटकार ठोकले.
हैदराबादचा डाव संकटात असताना राहुल त्रिपाठी (55) व हेन्रीच क्लासेन (32) यांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा प्रतिकार करीत 37 चेंडूंत 62 धावांची भागीदारी करीत हैदराबादला धावांची शंभरी गाठून दिली. त्रिपाठीने 35 चेंडूंत 7 चौकार व एका षटकारांसह आपली अर्धशतकी खेळी सजविली, तर क्लासेनने 21 चेंडूंत 3 चौकारांसह एक षटकार ठोकला. वरुण चौधरीने क्लासेनला रमनदीप सिंगकरवी झेलबाद केले, तर त्रिपाठी दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आलेल्या सन्वीर सिंगची सुनील नरेनने भोपळाही पह्डू न देता दांडी गुल केली. मग अब्दुल समद (16) बाद झाल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने 24 चेंडूंत 2 षटकार व तितक्याच चौकारांसह 30 धावांची खेळी करीत हैदराबादला 19.3 षटकांत 159 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. कोलकात्याकडून मिचेल स्टार्पने 3, तर वरुण चौधरीने 2 फलंदाज बाद केले. वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नरेन व आंद्रे रस्सेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मिचेल स्टार्पला धमाका

दरम्यान, नाणेफेकीचा काwल जिंपून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय सनरायझर्स हैदराबादच्या चांगलाच अंगलट आला. मिचेल स्टार्पने दुसऱयाच चेंडूवर ट्रव्हिस हेडचा शून्यावर त्रिफळा उडवून कोलकाता नाईट रायडर्सला सनसनाटी सुरुवात करून दिली. वैभव अरोराने पुढच्याच षटकात अभिषेक शर्माला (3) रस्सेलकरवी झेलबाद करून अवघ्या 13 धावांत हैदराबादची सलामीची जोडी तंबूत धाडली. मिचेल स्टार्पने पाचव्या षटकात नीतिश पुमार रेड्डी (9) व शाहबाझ अहमद (0) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून हैदराबादची 5 षटकांत 4 बाद 39 अशी दुर्दशा केली.

हेही वाचा :

देशात उत्तरेत उन्हाचा तडाखा तर दक्षिणेत पाऊस

ठाकरे कुटुंबातला तो मुलगा कोण? जो राजकारण नाही बॉलिवूडमध्ये येणार

उजनीच्या पाण्यावरून राजकारण पेटले, विद्यमान आमदारांवर चिखलफेक