क्रिसभाऊनं जिंकलं! कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहताच एका क्षणात रचलं गाणं… Video

क्रिकेट विश्वामध्ये मागील काही दिवसांत खेळवल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं त्याच्या गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडला. मैदान गाजवणारा हाच बुमराह काही निवांत क्षण व्यतीत करत आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी म्हणून तडक पोहोचला क्रिस मार्टिनच्या अर्थात कोल्डप्ले बँडच्या कॉन्सर्टला(concert).

26 जानेवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम इथं हा भव्य कॉन्सर्ट(concert) पार पडला आणि त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा करण्यात आलं. या ब्रिटीश बँडचं सादरीकरण पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाहत्यांनी गर्दी केली आणि याच गर्दीत होता, जसप्रीत बुमराह. हा स्टार क्रिकेटपटू कॉन्सर्टसाठी आल्याचं कळताच बँडमधील लिड वोकलिस्ट अर्थात मुख्य गायक असणाऱ्या क्रिस मार्टिननं त्याच्याच अंदाजात त्याचं स्वागत केलं आणि एका क्षणात त्याच्यासाठी तयार केलेलं छानसं गाणंही गुणगुणलं.

“Jasprit Bumrah, my beautiful brother,” असं म्हणत त्यानं बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक करत इंग्लंडच्या खेळाडूंचा धुव्वा कसा उडवला होता याचीच आठवण करुन देणानं गीत सादर केलं. सोबतीला स्टेडियममधील स्क्रीनवर क्रिकेट सामन्यातील दृश्य आणि बुमराहनं घेतलेले विकेट्स दाखवण्याता आले आणि संपूर्ण स्टेडियम ‘बुमराsssह बुमराssssह’ च्याच आवाजानं निनादून गेलं.

अधिकृत माहितीनुसार कोल्डप्लेच्या या कॉन्सर्टसाठी 134,000 हून अधिक चाहत्यांनी हजेरी लावली होती. एका परदेशी बँडसाठी चाहत्यांना लावलेली ही हजेरी आणि उपस्थितांचा हा मोठा आकडा पाहता आशिया खंडातील सर्वाधिक उपस्थिती असणारा हा शतकातील सर्वात मोठा कार्यक्रम असू शकतो असंही म्हटलं जात आहे. कोल्डप्ले हा बँड सध्या भारत दौऱ्यावर असून, मुंबईनंतर आता या बँडनं अहमदाबादमध्ये परफॉर्म करत चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. तुम्ही कधी असा एखादा कॉन्सर्ट अनुभवला आहे का?

हेही वाचा :

‘लाडक्या बहि‍णीं’मुळे तिजोरीत खडखडाट, सरकारचं मोठं नुकसान

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट

13व्या मजल्यावरून खाली कोसळली 2 वर्षांची मुलगी, अपघाताचा हा थरार…Video Viral