झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या श्रद्धा आर्या ने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. मुख्य म्हणजे अभिनेत्रीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. लग्नानंतर ३ वर्षांनंतर श्रद्धाने जुळ्या बाळांना जन्म दिलेला आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन बाळांसोबतचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज(good news) दिली आहे.
‘कुंडली भाग्य’ मालिकेत प्रीताची भूमिका तिने उत्तमरित्या वठवली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने श्रद्धाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी श्रद्धा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री श्रद्धा आर्यने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.
एक मुलगा आणि एक मुलगीला अभिनेत्रीने जन्म दिला आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी(good news) दिली आहे. २०२१ मध्ये राहुल नागल आणि श्रद्धा आर्याचे लग्न झाले. तिने सप्टेंबर २०२४ रोजी तिने प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. प्रेग्नेंसीची घोषणा करण्यापूर्वीच सोशल मीडियावर ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू होती.
“दोन छोट्या छोट्या आनंदाने आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे. आमचा हृदयात अनेक पटींनी आनंद झाला आहे.” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलेला आहे. श्रद्धाने प्रेग्नेंसीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टा पोस्ट शेअर करत ‘कुंडली भाग्य’ मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मागील काही ७ वर्षांपासून श्रद्धा या मालिकेत मुख्य पात्र साकारत होती. ११ आठवड्यांपूर्वी श्रद्धा आर्याने एका व्हिडिओ शेअर करत प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. अभिनेत्रीने काही तासांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा :
शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
मनोज जरांगे पाटील, पुन्हा आमरण उपोषणाच्या मैदानात!
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचीही उडी, राज्यभरात उभारणार जनआंदोलन