सांगली: ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी(yojana) अर्ज मंजूर झाले तरी काही महिलांना रक्कम अद्याप मिळालेली नाही, यामुळे त्या चिंतेत आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक महिलांचे हप्ते प्रलंबित राहिले आहेत. नव्या सरकारकडून मागील पाच महिन्यांचा साडेसात हजार रुपयांचा हप्ता मिळेल का, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात ४.५० लाख महिलांनी या योजनेसाठी(yojana) अर्ज भरले, त्यापैकी बहुतांश मंजूर झाले, परंतु काही अर्ज वेळेत मंजूर न झाल्याने त्या महिलांना अद्याप एकरकमी हप्ता मिळालेला नाही. काहींना पहिल्या तीन महिन्यांचा साडेचार हजार रुपयांचा हप्ता मिळाला, मात्र उर्वरित तीन हजार रुपये येणे बाकी आहेत.
निकषांवर सरकारचे कडक धोरण
राज्य सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर निकष लागू करण्याचे संकेत दिले आहेत. अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील, अशी शक्यता आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक अर्जदार महिलांवर याचा परिणाम होऊ शकतो.
महिलांमध्ये चर्चेचा मुख्य मुद्दा म्हणजे, पात्र ठरलेल्या महिलांना काहीच रक्कम मिळालेली नाही, त्यांचे भविष्य काय? नव्या सरकारकडून सर्व पात्र महिलांना सरसकट पाच महिन्यांचा हप्ता मिळावा, अशी मागणी महिलांमधून होत आहे. त्यानंतरच नव्या निकषांची कात्री लागू करावी, असा महिलांचा सूर आहे.
महिलांची अपेक्षा
या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी सरकारकडून स्पष्टता आणि तातडीने निर्णय अपेक्षित आहे. “सर्वप्रथम हक्काची रक्कम मिळाली पाहिजे, त्यानंतर निकषांची अंमलबजावणी केली तरी चालेल,” असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले आहे. महिलांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी नव्या सरकारकडून तत्काळ पावले उचलली जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
भर रस्त्यात उलटे उभे राहून बाईक चालवायला गेले अन्… Video
“जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस..”; मंत्रीमंडळात डावलल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया
कॉमेंटेटरने केली जसप्रीत बुमराहवर टीका! टीव्हीवर मागितली माफी, Video Viral