महाराष्ट्र राज्यात दोन दिवसांपासून सुरु असलेला एसटी(ST) कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वपूर्ण मागण्या मान्य झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
- मुळ वेतन वाढ: एसटी(ST) कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2020 पासून सरसकट मुळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
- महागाई भत्ता: जुलै 2016 ते जानेवारी 2020 या काळातील प्रलंबित महागाई भत्त्याचा परतावा कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.
- घरभाडे भत्ता: शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता लागू केला जाणार आहे.
- वार्षिक वेतनवाढ: वार्षिक वेतनवाढ देखील लागू केली जाणार असून वेतनवाढीसाठीची 2,100 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना लवकरच वितरित होणार आहे.
- कॅशलेस वैद्यकीय सेवा: कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय योजना लागू करण्यात आली आहे.
- मुक्त प्रवास पास: कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना एसटीत 1 वर्षासाठी मोफत प्रवास पासची सुविधा देण्यात येणार आहे.
- आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही: संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
हेही वाचा:
दोन्ही मुलांचा मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर; अशी वेळ कोणत्याच आई-बापावर येऊ नये!
निवडणुकीआधी महाराष्ट्राची चांदी! ७६ हजार कोटींची गुंतवणूक अन् १२ लाख रोजगार
आज ‘या’ 5 राशींवर राहील भगवान विष्णूची कृपा, धनसंपत्तीत होईल वाढ