सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे. महसूल असो किंवा गृहखाते (Maharashtra)असो हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत. असा घणाघातही आमदार धंगेकर यांनी केला ससून रुग्णालायतील दोन डाॅक्टर हसन मुश्रीफांच्या आशीर्वादाने काम करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता. माफी मागितली नाही तर धंगेकरांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे प्रतिआव्हान मुश्रीफांनी दिले होतं. मात्र, कोल्हापूरमध्ये येऊन धंगेकरांनी ‘सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये.’ असे म्हणत मुश्रीफांना डिवचले आहे.
‘ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही. धंगेकर हा घाबरणारा माणूस नाही’. या शब्दात धांगेकर यांनी मुश्रीफ यांना सुनावले. मी पुणेकर आहे. घाबरणारा नाही. 4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेन, (Maharashtra)असे धंगेकरांनी ठणकावले.
तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे. सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे. महसूल असो किंवा गृहखाते असो हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत. असा घणाघात ही आमदार धंगेकर यांनी केला.
तावरेला भर चौकात फाशी द्या
डाॅ. अजय तावरे यांनी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्याचं रक्त पिवून मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे धंगेकर म्हणाले.
तर जेलमध्ये जाईल
पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे. पब बंद होणार नसतील तर (Maharashtra)मी कुणाची माफी मागणार नाही. असे हसन मुश्रीफ आणि शंभूराज देसाई यांना ठणकावताना जेलमध्ये जाण्याच्या तयारी धंगेकर यांनी दाखवली. मी गरीब कार्यकर्ता आहे. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाहीत. मी जेलमध्ये जाईल, असे धंगेकर म्हणाले.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा
लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये…; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?
मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप