कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : चांगले पर्जन्यमान असलेल्या शाहूवाडी तालुक्याला ऐतिहासिक महत्त्व आहे(politics). छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन असलेला विशाळगड याच तालुक्यात आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांदल सेनेच्या बलिदानाने पावन झालेली घोडखिंड अर्थात पावनखिंड याच तालुक्यात आहे.
तसा हा दुर्गम आणि डोंगराळ भाग. पर्यटन समृद्ध तालुका असूनही विकासाच्या मुख्य प्रवाहात हा तालुका आलेला नाही, हे तेथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. तथापि या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाते विकास मात्र होत नाही. या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या निवडणुकीत विनय कोरे सावकार विरुद्ध सत्यजित पाटील सरूडकर आबा अशी लढत होत आहे. हे दोघे दुसऱ्यांदा एकमेकांसमोर ठाकले आहेत.
या विधानसभा(politics) मतदारसंघातून उदयसिंह गायकवाड निवडून यायचे. त्यांचाही एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या राऊत धोंडी पाटील यांनी पराभव केला होता. ठाकरे गटाचे विद्यमान उमेदवार सत्यजित पाटील आबा यांचे पिताश्री बाबासाहेब पाटील सरूडकर हे अविभाजित शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेवर गेले होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव सत्यजित आबा हे सलग दोन वेळा निवडून आले. 2019 मध्ये मात्र त्यांचा अभिनय कोरे यांनी पराभव केला. कोरे यांच्या मूळच्या पन्हाळा बावडा मतदारसंघातील 32 गावे शाहूवाडी मतदारसंघात समाविष्ट आहेत. ही गावे त्यांच्या प्रभावाखालची तसेच वारणा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आहेत.
काँग्रेस आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. वारणा उद्योग समूहाचे ते प्रमुख आहेत. पूर्वी त्यांचे पारंपरिक राजकीय शत्रू यशवंत एकनाथ पाटील होते. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत त्यांना शाहूवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते आहे आणि त्यांचे सततचे प्रतिस्पर्धी सत्यजित आबा हे आहेत.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे हे संस्थापक आहेत तर दुभंगलेल्या शिवसेनेच्या उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित आबा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धैर्यशील माने यांना घाम फोडला होता. तेव्हा त्यांनी मोठी हवा तयार केली होती. सत्यजित आबा यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील बाबासाहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
त्यांच्या मातोश्री गोकुळच्या संचालिका आहेत. बाबासाहेब हे आमदार होते आणि शिराळा सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत. या राजकीय पार्श्वभूमीचा सत्यजित आबा यांना दोन वेळच्या निवडणुकीत फायदा मिळाला आहे. तर विनय कोरे यांना त्यांचे आजोबा तात्यासाहेब कोरे यांच्याकडून सहकाराचा वारसा मिळाला आहे. त्यांनी स्वतः जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना करून अगदी सुरुवातीला चार आमदार निवडून आणून महाराष्ट्रात हवा तयार केली होती. ते फलोद्यान मंत्री होते. ते कायम विकासाचा प्रारूप आराखडा घेऊनच वावरत असतात. ज्योतिबा डोंगर ते पन्हाळा असा “रोप वे”करण्याचा त्यांचा प्रकल्प होता पण तो प्रत्यक्षात मात्र आला नाही.
या शाहूवाडी मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा(politics) प्रभाव आहे. ऊस उत्पादक शेतकरी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांची भूमिका इथे निर्णायक ठरते. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी सत्यजित पाटील आबा यांना समर्थन दिले आहे. लोकसभा निवडणुकीत ते विरोधक होते. म्हणजे राजू शेट्टी हे सुद्धा निवडणूक रिंगणात होते. राजू शेट्टी यांच्या माध्यमातून सत्यजित आबा यांना परिवर्तन महाशक्ती आघाडीचा पाठिंबा आहे.
या मतदारसंघात दोन्हीही उमेदवार तगडे आहेत. अटीतटीची लढाई इथे होणार आहे. दोन्हीही उमेदवार मतदार संघातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत. सत्यजित आबा यांच्या निवडणूक चिन्हात बदल झाला आहे तर विनय कोरे यांच्या निवडणूक चिन्हातही थोड्याफार फरकाने बदल झालेला आहे.
या मतदारसंघात विशाळगड हा गेल्या काही वर्षांपासून अति संवेदनशील बनलेला छत्रपती शिवरायांचा गड आहे. लोकसभा निवडणुकीनंतर गडावरील काही अतिक्रमणे काढण्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता. विनय कोरे तसेच सत्यजित आबा हे या संवेदनशील विषयांपासून काही अंतर राखून होते. विशाळगड प्रकरणाची पार्श्वभूमी यंदाच्या विधानसभा निवडणुकीला आहे.
हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या अडचणीचा आहे. अजूनही अनेक गावे वाड्यावर त्या मूलभूत सुविधांपासून दूर आहेत. चांगले रस्ते नाहीत, उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा नाहीत. या तालुक्यातील रुग्णाला कोल्हापुरात उपचारासाठी यावे लागते. विद्यार्थ्यांना आजही घरापासून दूर असलेल्या शाळेला पायपीट करूनच जावे लागते. वाहतुकीची सुविधा नाही. अशा अनेक समस्या या मतदारसंघात आहेत पण त्या सोडवल्या जात नाहीत हे सुद्धा वास्तव आहे.
हेही वाचा :
BCCI च्या नव्या निर्णयामुळे ‘या’ स्टार खेळाडूला 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी
लसूण 500, कांदा 80… भाज्यांचे भाव कडाडले, सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची फोडणी
राजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe