काँग्रेस पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मिळू दे, मी माघार घेईन; विशाल पाटील यांचं वक्तव्य

”काँग्रेस एकसंघ होती, हे कुणाला बघवले नाही. काँग्रेस पक्षाकडून(nomination) कोणालाही उमेदवारी मिळू दे, मी माघार घेईन. पण काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपवून जावेत, असा उद्देश काही जणांचा आहे, मला अजून ही विश्वास आहे. मला उमेदवारी मिळेल”, असं काँग्रेस नेते विशाल पाटील म्हणाले आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून(nomination) तिकीट न मिळाल्याने ते नाराज आहे. अशातच त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातच आज त्यांनी सांगलीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी उपस्थित कार्यकर्तांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

त्यांनी माघार घ्यावी, आता मी कामाला लागलो आहे, असं ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना उद्देशून विशाल पाटील यावेळी म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ”प्रचार गावोगावी होईल. सांगलीला शोभेल, असे काम आणि अभिमान वाटेल, असा खासदार मी होईन. लोक माझ्या उमेदवारीला पाठिंभा देतील.”

शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे, असं म्हणत चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती. यावरच प्रत्युत्तर देताना विशाल पाटील आज म्हणाले की, ”कोणीतरी आरोप केला, शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहवत नाही का? वसंतदादा यांच्या घराण्याने शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद देण्याचं काम केलेलं आहे. आमची तीच भावना आहे, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार, आमदार झालं पाहिजे. पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे, हे सुद्धा पाहण्याची जबाबदारी आमची आहे.”

संजय राऊत यांच्यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, ”त्या पैलवानांना विनंती आहे, संजय राऊत आधीच येथे येऊन खूप गोंधळ घालून गेले आहेत. ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे. येथे भाषा, शोभणारी बोलावी. आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत. त्यामुळे त्यांच्या पुस्तकातील शब्द आणि भावना वापरून लोक आणखी पेटतील. त्यामुळे आता राजकारण करायचं असेल, तर ते सगळ्यांनी संयम ठेवून करावे. भाषा सांभाळून वापरा.”

हेही वाचा :

राज ठाकरेंकडून मुलांच्या शाळेबाबत सरकारकडे महत्त्वाची मागणी

कोल्हापुरात खळबळ; महायुतीची साथ सोडताच ए. वाय. पाटलांवर गुन्हा दाखल

‘जुन्या वादात अडकून पडू नका, भविष्याचा विचार करून निर्णय घ्या’; जयंत पाटलांचा काँग्रेसच्या विशाल पाटलांना सल्ला