वाशिम येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक(incident) घटना घडली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी कॉम्प्युटर क्लासमधून घरी परतत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला गाठले. त्याने, “मी तुझ्या वडिलांचा मावसभाऊ आहे आणि तुझे मामा मला ओळखतात. माझ्या घरी चल, माझी मुलगी तुला भेटायला उत्सुक आहे,” असे सांगून तिला फसवले.

त्यानंतर त्याने तिला ऑटोरिक्षात बसवून एका निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिला चाकूचा धाक दाखवत, “शारीरिक संबंध ठेवू दे, नाहीतर मी तुझा गळा चिरून तुला विहिरीत फेकून देईन,” अशी धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला.या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रिसोड (incident) पोलीस ठाण्यातअज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसत्याचा शोध घेत आहेत.
जेव्हा पीडित मुलगी घरी गेली आणि तीने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला असता तेव्हा कुटुंबियांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी रिसोड पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र (incident) वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासात लैंगिक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या घटनेने जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
वाशिम शहरात एका सहा वर्षीय बालिकेवर बलात्काराची एक घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत दुसरी घटना घडल्याचे समोर आले आहे. गेल्या 24 तासात लैंगिक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या घटनेने जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट
मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल
पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन video viral