कुडित्रे : जिल्ह्यात शेतकरी(agriculture) सुमारे २५०० कोटी रुपये पिक कर्ज काढतात आणि शंभर टक्के भरून पुन्हा दरवर्षी पीक कर्ज घेतात. मात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्याच्या मागचा कर्जाचा फेरा सुटलेला नाही.
त्यामुळे आज शेतकरी(agriculture) प्रचंड आर्थिक ताण अन् मानसिक विवंचनेत असल्याचे पहायला मिळत आहे. २३ डिसेंबर हा भारताचे पाचवे पंतप्रधान चरणसिंग चौधरी यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त…
एकीकडे भारत महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे शेतकरी हवालदिल आहे. स्वातंत्र्यानंतर आजही वर्षानुवर्षे शेतकऱ्याचा सातबारा कर्जविना कोरा झालेला नाही. शेतीवर नियम व कायदे लादले जातात, त्यांना आपल्या क्षुल्लक मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे मार्गांचा अवलंब करावा लागतो.
सध्या शेतकऱ्यांचा मुलांना मुली देण्यास कोणी तयार होत नाही.एकंदर शेतकऱ्यांना योग्य निर्णायक योजना, मानसिक आधार, मुलांच्या शिक्षणासाठी योजना राबवून चक्रातून शेतकऱ्यांना वेळीच बाहेर काढावे, अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त हेत आहे.
शेतीत २०१०-११ मध्ये सहा लाख ३८ हजार २८४ शेतकरी, चार लाख ५७ हजार ७९५ हेक्टर शेतीचे क्षेत्र होते. २०१५-१६ कृषी गणनेनुसार सहा लाख ६० हजार ६७६ शेतकरी, चार लाख ८८ हजार २३ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये ३.५ टक्के शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली, तर सात टक्के क्षेत्रात वाढ होऊन अल्प भूधाकरक शेतकऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रस्ते, प्रकल्प, शहरीकरणामुळे दरवर्षी शेती क्षेत्रात प्रचंड घट होत आहे. राष्ट्रीय किसान दिनानिमित्त निर्धार करून शेतकऱ्यांची परिस्थितीत बदलण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे.
हेही वाचा :
जिओचा नवा प्लॅन, 3 महिने रिचार्जचं नो टेन्शन, अनलिमिटेड कॉलिंग
नाराज भुजबळ थेट भाजपाच्या वाटेवर?, CM फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
दिल्लीच्या बहिणींसाठी ‘आप’ची नवी योजना: सत्तेची चावी केजरीवालांच्या हातात?