संभाजीनगर : लोकसभा आणि मागील महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडली. आता विधानसभा निवडणूक होताच केंद्र सरकारने जनगणना(census) करण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार जनगणनेच्या कामासाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जणगणनेला(census) सुरुवात झाली तर मनपा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, एक ते दोन वर्ष ही प्रक्रिया सुरु राहणार असल्याने आणखी निवडणुका लांबवण्यात येणार नसल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.
केंद्र सरकारमार्फत दर दहा वर्षांनी जणगणना केली जाते. यापूर्वी 2011 मध्ये जणगणना झाली होती. त्यानंतर मात्र जणगणनेला मुहूर्त लागलेला नाही. 2021 मध्ये जणगणना होणे गरजेचे असताना कोरोना महामारीमुळे जनगणना लांबणीवर टाकण्यात आली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असल्यामुळे जनगनणेला केंद्र सरकाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला नाही.
केंद्र सरकारकडूनच जणजगना करण्यासाठी वेळकाढूपणा काढला जात आहे. महाराष्ट्र व झारखंड राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्यामुळे आता लवकर कोणत्याही निवडणूक नसल्यामुळे केंद्र सरकारकडून जणगणना करण्याची तयारी केली जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जणगणना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सूचना देण्यात आल्या असून, त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज संस्थांना तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
दुसरीकडे, नव्याने मुख्यमंत्री म्हणून पदावर बसल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अगोदरच लांबलेल्या निवडणुका पुन्हा लांबवणार नसल्याचे अंदाजही तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
महापालिकेला जणगणना कार्यक्रम राबवण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना मिळाल्याने जणगणनेशी संबंधित सर्व कामकाज, पत्रव्यवहार कामांसाठी उपायुक्त-३ यांच्या नियंत्रणाखाली नगररचना विभागाचे उपअभियंता बाळासाहेब शिरसाट, सहायक नगर रचनाकार सुरज नामदेव सवंडकर, सहायक नगर रचनाकार सौरभ नानासाहेब साळवे, अनुरेखक संजय कपाळे, लिपिक टंकलेखक शरद गजहंस या पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून जणगणनेच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जणगणनेच्या कामाला सुरुवात झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
जणगणना कार्यक्रम राबविण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार असून, त्यादरम्यान अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत इतर कोणताही कार्यकम राबविला जात नाही. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणूका घेतल्या जाणार किवा नाही यावर आता प्रश्न चिन्ह कायम असल्याचे समोर आले.
हेही वाचा :
भान हरपून रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं तरुणीला पडलं महागात… Video Viral
CNG चा स्फोट अन् ‘इतके’ जण जीवंत जळाले…
स्नायू कमकुवत, उंचीत वाढ; अंतराळात सुनीता विल्यम्सच्या शरीराचे होतेय नुकसान?