नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या(holidays) संपवून प्रत्येकजण आपापल्या कामाला लागले आहेत. असं असताना पुन्हा एकदा लाँग विकेंड आलेला आहे. पुन्हा एकदा लोकांना लाँग विकेंडचा आनंद अनुभवता येणार आहे. दसरा, दिवाळीनंतर आता थेट ख्रिसमसची सुट्टी मिळेल असा अनेकांचा समज होता पण त्यांना सुखद आनंद देणारा हा लाँग विकेंड आला आहे.
15 नोव्हेंबर रोजी ‘गुरु नानक’ जयंती आहे. त्यानिमित्त सुट्टी (holidays)आहे. गुरु नानक जयंतीला शुक्रवार असून नंतर 16 नोव्हेंबर रोजी शनिवार आणि 17 नोव्हेंबर रोजी रविवार आहे. अशा स्थितीत सलग 3 दिवस सुट्टी आहे. या लाँग विकेंडला तुम्ही फिरण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता.
महाबळेश्वर
हिवाळ्यात महाराष्ट्रातील महाबळेश्वरला जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. येथे तुम्ही लिंगमळा धबधबा, वेण्णा तलाव, महाबळेश्वर मंदिर पाहू शकता. तुम्ही पुण्याहून बस किंवा टॅक्सीने प्रवास करू शकता. महाबळेश्वरला भेट देण्याचा खर्च सुमारे 15000 रुपये असू शकतो. थंड हवेचं ठिकाण असलेली ही जागा सर्वोत्तम पर्याय ठरु शकते.
कोडाइकनाल
मदुराईहून तुम्ही बस किंवा टॅक्सीने कोडाइकनालला पोहोचू शकता. येथे तुम्ही कोडाईकनाल तलाव, कोकर लेणी आणि ब्रायंट पार्कला भेट देऊ शकता. 15,000 रुपये खर्चून तुम्ही 2 ते 3 दिवसांच्या सहलीला जाऊ शकता. लाँग विकेंडसाठी ही जागा उत्तम पर्याय ठरु शकते.
कुर्ग
कर्नाटकातील कुर्ग शहर खूप सुंदर आहे. येथे तुम्ही ॲबे वॉटर फॉल, राजाचे आसन, कूर्ग कॉफी प्लांटेशनला भेट देऊ शकता. म्हैसूर किंवा बेंगळुरू येथून बसने कुर्गला पोहोचता येते. मुंबई ते बंगलुरु प्रवास हा विमानाने किंवा रोडने करणे चांगले ठरु शकते.
शिलाँग
मेघालयातील शिलाँगला सहलीला जाणे हा एक अद्भुत अनुभव असू शकतो. येथे तुम्ही एलिफंट वॉटरफॉल, उमियम लेक किंवा शिलाँग शिखराला भेट देऊ शकता. गुवाहाटीहून शिलाँगला सहज पोहोचता येते.शिलाँग हा लाँग विकेंडसाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
मुन्नार
चहाचे मळे आणि हिरवळ पाहण्यासाठी तुम्ही केरळमधील मुन्नार हिल स्टेशनवर जाऊ शकता. येथे चहाचे मळे, एरविकुलम नॅशनल पार्क आणि अट्टुकल फॉल्स ही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. कोचीहून रोड किंवा रेल्वेने येथे पोहोचता येते.
हेही वाचा :
‘शिस्त पाळा अन्यथा…’, एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा
मुकेश खन्ना यांना पुन्हा ‘शक्तिमान’च्या भूमिकेत पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली; ‘तो’च म्हणतो ‘साहेब मस्करी करत होते!’