चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कपवर नजर… 2025 मध्ये कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं शेड्युल?

भारतीय पुरुष क्रिकेटसाठी 2024 हे वर्ष अतिशय खास ठरलं. जून 2024 रोजी टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव करून विजय मिळवला. टीम इंडियाने तब्बल 18 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप(Trophy) जिंकला. परंतु जुलैनंतर भारतीय पुरुष संघाचे पुढील सहा ,महिने अतिशय कठीण राहिले.

टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध भारतात झालेली सीरिज 0-3 ने गमावली. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सुद्धा टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे. 2025 मध्ये भारतीय क्रिकेट संघ अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळणार आहे. तेव्हा या स्पर्धा नेमक्या कधी आणि कुठे होतील याविषयी जाणून घेऊयात.

सिडनी टेस्ट (बॉर्डर गावकर ट्रॉफी) :
2025 बद्दल बोलायचं झालं तर नवीन वर्षात टीम इंडिया त्यांचा पहिला सामना हा 3 जानेवारी रोजी सिडनी येथे खेळत. या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला जिंकणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2-2 अशा बरोबरीत सुटेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(Trophy) फायनलच्या शर्यतीत देखील ते टिकून राहतील.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 :
फेब्रुवारी मार्च दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे(Trophy)आयोजन करण्यात आले असून टीम इंडियाने मागे 2013 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती तर 2017 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हे पाकिस्तानमध्ये होईल तर भारतीय सरकारने क्रिकेट संघाला पाकिस्तानला जाण्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाचे सामने हे दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. दरम्यान यानंतर वेस्ट इंडिजच्या टीम सोबत देखील भारतीय संघ 2 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळेल.

इंग्लंड विरुद्ध टी 20 आणि वनडे सिरीज : (भारतात)
1st T20: 22 जानेवारी – एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
2nd T20: 25 जानेवारी – ईडन गार्डन्स, कोलकाता
3rd T20: 28 जानेवारी – सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, राजकोट
4th T20: 31 जानेवारी – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, पुणे
5th T20: 2 फेब्रुवारी – वानखेड़े स्टेडियम, मुंबई
1st ODI: 6 फेब्रुवारी – विदर्भ क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, नागपुर
2nd ODI: 9 फेब्रुवारी – बाराबती स्टेडियम, कटक
3rd ODI: 12 फेब्रुवारी – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

फेब्रुवारी ते मार्च :
चॅम्पियन्स ट्रॉफी (यूएई आणि पाकिस्तान)
20 फेब्रुवारी : भारत विरुद्ध बांग्लादेश – दुबई
23 फेब्रुवारी : भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई
1 मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड – दुबई

मार्च ते मे :
इंडियन प्रीमियर लीग 2025

जून ते ऑगस्ट 2025 :
इंग्लंड विरुद्ध टेस्ट सिरीज : 2025

1st टेस्ट: 20-24 जून – हेडिंग्ले, लीड्स
2nd टेस्ट: 2-6 जुलै – एजबेस्टन, बर्मिंघम
3rd टेस्ट: 10-14 जुलै – लॉर्ड्स, लंडन
4th टेस्ट: 23-27 जुलै – एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनचेस्टर
5th टेस्ट: 31 जुलै -4 ऑगस्ट – केनिंगटन ओवल, लंडन

ऑगस्ट 2025:
बांगलादेश विरुद्ध सीरिज 2025
3 सामन्यांची वनडे सीरिज
3 सामन्यांची टी20 सीरिज

ऑक्टोबर 2025:
वेस्टइंडीज विरुद्ध टेस्ट सीरीज
2 सामन्यांची टेस्ट सीरिज
टी 20 एशिया कप 2025

ऑक्टोबर- नोव्हेंबर 2025 :
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 आणि वनडे सिरीज (ऑस्ट्रेलियामध्ये)
3 वनडे सामन्यांची सीरिज
5 टी20 सामन्यांची सीरिज

नोव्हेंबर – डिसेंबर 2025 :
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरिज (भारतामध्ये)
2 टेस्ट सामन्यांची सीरिज
3 वनडे सामन्यांची सीरिज
5 टी20 सामन्यांची सीरिज

हेही वाचा :

भारतीय संघात चाललेय काय! गौतम गंभीरचा संताप; खेळाडूंची जोरदार बाचाबाची

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; खत आणि पीकविमा योजनांवर मिळणार जास्त सबसिडी

वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली आली समोर! 25 वर्षात तब्बल ‘इतके’ गुन्हे दाखल