नाश्त्यासाठी पदार्थ शोधताय? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवून पहा रव्याचा उत्तपम

भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेदुवडा, आप्पे, रसम, उत्तपम(breakfast) इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं हे पदार्थ खूप आवडतात.

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात प्रामुख्याने दक्षिण भारतीय पदार्थ(breakfast) बनवले जातात. तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेले डोसे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही रव्याचे उत्तपम बनवू शकता.

रव्याचे उत्तपम बनवण्यासाठी अतिशय सोपे आहे. कमीत कमी वेळात झटपट रव्याचे उत्तपम तयार होते. तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठापासून उत्त्पम बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. मात्र कमीत कमी वेळात जर तुम्हाला उत्तपम बनवण्याचे असेल तर तुम्ही रव्याचे उत्तपम बनवू शकता. चला तर जणूं घेऊया रव्याचे उत्तपम बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • रवा
  • दही
  • कांदा
  • कोथिंबीर
  • टोमॅटो
  • मीठ
  • तेल
  • हिरवी मिरची
  • गाजर
  • काळीमिरी पावडर
  • जिरे पावडर
  • शिमला मिरची

कृती:

  • रव्याचे उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम, रवा स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये स्वच्छ केलेला रवा, दही आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • बाऊलमध्ये सर्व बारीक करून घेतलेल्या भाज्या. काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • पॅन गरम करायला ठेवून पॅनवर थोडेसे तेल टाकून पसरवून घ्या. नंतर त्यावर उत्तपम साठी रव्याचे मिश्रण टाकून त्यावर सर्व भाज्या टाका.
  • भाज्यांना वाफ आल्यानंतर उत्तपम उलटा करून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून वरून तूप किंवा चीझ टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रवा उत्तपम.

हेही वाचा :

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राहु आणि बुधाची युती; 3 राशींचे ‘अच्छे दिन’

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! यापुढे ‘एक देश, एक निवडणूक’…?

भाजपचा केंद्रीय नेता आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?