सराफा बाजारात ग्राहकांना लॉटरी; सोने-चांदीत मोठी घसरण

दोन दिवस भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात शनिवारी घसरण झाली. (bullion)यात सोने भाव एक हजार १०० रुपयांनी कमी होऊन ८५ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आलातसेच चांदीच्याही भावात दोन हजार १०० रुपयांनी घसरण होऊन चांदी ९६ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली. गुरुवारी आणि शुक्रवार सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. दरवाढीमुळे सोने ८६ हजार ३००, तर चांदी ९८ हजार ३०० रुपयांवर पोहोचली होती.

शनिवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घसरण झाली. (bullion) सोने एक हजार १०० रुपयांनी घसरून ८५ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले. तर चांदीही दोन हजार १०० रुपयांनी घसरून ९६ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली.
गेला एक ते दीड महिन्यात पहिल्यांदाच सोन्याचे चांदीचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. घसरणीमुळे आठवड्याच्या अखेरीस सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी झाली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (bullion) IBJA हे भाव जाहीर करते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतातग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

हेही वाचा :

लग्नासाठी नवरदेव सजला पण घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral

LIC ने पॉलिसीधारकांसाठी लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म

गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी! ‘ही’ कंपनी देत आहे एका शेअर वर एक शेअर बोनस!