इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना लागणार लॉटरी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

केंद्र सरकार जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करणार आहे(income tax). या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबाबत बैठका घेतल आहेत.

अर्थ मंत्रालय अर्थसंकल्पात(income tax) आयकरबाबत मोठा निर्णय घेणार आहे. मध्यमवर्गीय लोकांना दिलासा आयकर सवलतीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना आयकर सूट मिळण्याची अपेक्षा आहे.

नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पात आयकर सूट दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार नवीन कर प्रणालीमध्ये बदल करु शकते. १५ ते १७ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी आयकर दर कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

मागील टर्ममध्ये सरकारने नवीन कर प्रणाली सुरु केली होती. यामध्ये ७ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना आयकर कर भरावा लागत नाही. त्यानंतर आता १५-१७ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना कमी कराची तरतूद केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मागील अर्थसंकल्पात ७ लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना आयकर सूट दिली होती. त्याआधीच्या जुन्या करप्रणालीनुसार ५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नव्हता. तसेच या दोघांवर ५० हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन लागू होते. म्हणजेच ७.५० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागत नाही. त्यानंतर आता १५ ते १७ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांचा आयकर कर कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

आता चहा पिणेही होणार महाग? भारतीय चहा उद्योग संकटात

दीपिकाच्या प्रेग्नन्सीवर राणाची मिश्किल टिप्पणी; अभिनेत्री म्हणाली, “तीन वर्ष…”

भयंकर! बंदुकीच्या धाकावर पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार