आमिर खानच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री; ‘या’ व्यक्तीला करतोय डेट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Entertainment news) आजही परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आजही तो त्याच्या अभिनयासाठी प्रचंड मेहनत करताना दिसतो. गेले ४० वर्ष तो अभिनयक्षेत्रात काम करतोय. त्याच्या हिट चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. मात्र जितके त्याचे सिनेमे चर्चेत असतात. तितकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. दुसरं लग्न तुटल्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता त्याच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एंट्री झाल्याचं समोर आलंय.

१९८६ साली आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. ती त्याची बालमैत्रीण होती. दोघांनी १६ वर्षांनी घटस्फोट घेतला होता. नंतर आमिरने २००५ साली दिग्दर्शिका किरण रावशी लग्नगाठ(Entertainment news) बांधली. ‘लगान’ च्या सेटवरच ते भेटले होते. मात्र किरणसोबतही त्याचा घटस्फोट झाला.

यांचंही लग्न १६ वर्ष टिकलं. आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एंट्री झालीये. ‘फिल्मफेअर’ ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आमिर खानच्या आयुष्यात मिस्ट्री वुमन आली आहे. ती बंगळुरुची आहे. अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीकडून हा खुलासा करण्यात आला आहे.

सध्या आमिर आपल्या गर्लफ्रेंडबद्दल काहीही सांगू इच्छित नाही. सर्वांनी त्याच्या प्रायव्हसीचा सन्मान करावा असं त्या व्यक्तीने सांगितलंय. तो या रिलेशनशिपध्ये खूप सीरियस आहे. त्याने या मिस्ट्री वुमनची भेट कुटुंबातील सदस्यांशीही करुन दिली आहे. कुटुंबाशी भेटही चांगली झाल्याची माहिती आहे. आता या बातमीनंतर आमिर खान पुन्हा एकदा लग्न करणार का अशी चर्चा सुरू झालीये.

‘कयामत से कयामत तक’, ‘रंग दे बसंती’, ‘दिल चाहता है’ सारख्या सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत तो ‘मी आता ५९ वर्षांचा आहे. आता या वयात मी कुठे परत लग्न करु. मला तरी अवघड दिसतंय’ असं म्हणाला होता. मात्र आता त्याच्या लग्नाच्या चर्चा कितपत खऱ्या ठरणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा :

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा ! मोदी सरकार पुढील पाच वर्षात 10 हजार फेलोशिप देणार

Budget 2025: शेतीमाल निर्यातदारांसाठी कार्गो सिस्टीम युझर फ्रेंडली

गौतम अदानी यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून अर्थसंकल्प; खासदार संजय राऊतांचा घणाघात