‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत(Love). अरबाज आणि निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात आणखी एक प्रेम प्रकरण सुरू होतंय का, याची चर्चा सुरू झाली आहे. हे प्रेम प्रकरण हे लव्ह ट्रँगल आहे. बिग बॉसच्या घरात आता आणखी काय घडणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सीझनला(Love) सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात फ्लर्टिंग सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आता बिग बॉस मराठीच्या घरात दुसरी लव्ह स्टोरी सुरू होणार असल्याची चिन्ह आहेत.
रांगड्या मातीत ‘परदेसी’ प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले आहे. बिग बॉसने देखील वैभवची फिरकी घेतली होती. आता, रॅपर आर्यादेखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हे येणारा काळच ठरवेल.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान वैभव म्हणतो,”कसली क्यूट आहे यार ही”. पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. पुढे वैभव आर्याला विचारतो,”काय विषय आहे नक्की?”. त्यावर आर्या म्हणते,”मला तू नॅचरली अॅटरॅक्टिव्ह वाटतो”. यावर वैभव म्हणतो,”मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही”. पण आर्या म्हणते,”मला होऊ शकतं अॅटरॅक्शन”.
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखिल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे भाऊच्या धक्क्यावर वीकेंडला समजणार आहे.
हेही वाचा :
सावधान! कर्करोगाचा धोका दुप्पट करतात ‘या’ 3 गोष्टी, आजच त्यांच्यापासून दूर राहा!
सर्वोत्तम नाश्त्याची नवीन स्वादिष्ट निवड: पालक-पनीर पराठे
शेतकऱ्याच्या लेकीची खाकीला गवसणी: सोशल मीडियापासून लांब राहा, अभ्यास करा!