प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारं पात्र केलं’, अरुंधतीचा प्रेक्षकांना निरोप

स्टार प्रवाहवर गेल्या ५ वर्षांपासून सुरू असणारी लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारणारे अभिनेते ( actress)मिलिंद गवळी यांनी लांबलचक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. अभिनेत्याने ज्याप्रमाणे भावुक होत ही पोस्ट केली होती, तशीच भावुक प्रतिक्रिया मालिकेचा चेहरा असणाऱ्या अरुंधतीने दिली आहे. चाहत्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाने ती भारावून गेल्याचे अरुंधती म्हणाली


यावेळी अभिनेत्रीने ( actress)अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की हा प्रवास खूपच मोठा होता. सुरुवातीला तिलाही वाटले नव्हते की, ५ वर्ष चालणाऱ्या, प्रेक्षकांचं प्रेम मिळवणाऱ्या एका प्रोजेक्टचा भाग होतो आहोत. मधुराणी म्हणाली की, ‘ही ५ वर्ष कशी निघून गेली हे कळलंच नाही. महिन्यातील २०-२२ दिवस आम्ही शूट करतोय, सेटवरच आहोत. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे सीन केले, इतका अरुंधतीचा ग्राफ आहे, इतके वेगवेगळे पदर या पात्राचे आहेत की, थोडसं भावनाविवश व्हायला होतं.’ राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत मधुराणी बोलत होती.


तिने पुढे असंही म्हटलं की, ‘खूपच भारावून टाकणारा प्रतिसाद होता. आपण इथे शूट करत असतो, टीआरपी दिसत असतो आणि त्यामुळे लोकांना प्रत्यक्ष भेटण्याची तशी वेळ येत नाही. जेव्हा मालिका यशाच्या शिखरावर होती, अरुंधतीचं स्वत:साठी उभं राहणं वगैरे दाखवलं जात होत… तेव्हा ज्या पद्धतीने येऊन लोक भेटत होते, आजही येऊन भेटतात… डोळ्यात पाणी असतं. कुठेतरी स्वत:ला बघत असतात अरुंधतीमध्ये आणि प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारं पात्र टेलिव्हिजनच्या माध्यमातून करायला मिळालं. याबाबतीत मी स्वत:ला नशिबवान समजते.


‘आई कुठे काय करते’ ही मालिका २०१९ मध्ये सुरू होती. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, शेखर अभिषेक, यश, ईशा, अप्पा, कांचन, शंतनू, विशाखा, आशुतोष, अनिष या पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही पात्रे मराठी मालिका पाहणाऱ्यांच्या घराघरात पोहोचली होती. अखेर ५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
एकेकाळी टीआरपीचे रेकॉर्ड मोडणारी ही मालिका काही महिन्यांपासून TRP च्या यादीत खाली घसरली होती. प्रेक्षकांकडून कथानकावरही टीका झाली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मालिकेची रात्री असणारी वेळ बदलून दुपारी २.३० वाजता मालिका प्रसारित केली जाऊ लागली. आता २ डिसेंबरपासून दुपारी अडीचच्या वेळेत ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही मालिका सुरू होणार आहे.

हेही वाचा :

राहा कपूरच्या वाढदिवसानिमित्तानं नीतू कपूर आणि रिद्धिमानं शेअर केली Unseen फोटो

अमेरिकेत गाढव V/s हत्तीची लढाई! कमला हॅरिस यांच्या पक्षाचं चिन्ह गाढव कसं काय?

‘पुष्पा 2’ चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटावर परिणाम!