कोल्हापूर: विधानसभा निवडणुकांच्या(political) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे कोल्हापुरात काँग्रेसवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराज छत्रपतींवर अक्षरश: संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर, शाहू राजेंनी आमची फसवणूक केल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली.
काँग्रेसने कोल्हापूर (political)उत्तर मतदारसंघातून सुरूवातीला राजेश लाटकरांना उमेदवारी दिली होती. पण अचानक लाटकर यांची उमेदवारी रद्द करून शाहू महाराज छत्रपती यांच्या सुनबाई मधुरिमाराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राजेश लाटकरांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
माघार घेण्याच्या दिवशी लाटकर नॉटरिचेबल झाले त्यामुळे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेरच्या क्षणी मधुरिमा राजेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेतल्यानंतर मालोजीराजेंनी मधुरिमा राजेंचा हात ओढत बाहेर नेलं.त्यामुळे काँग्रेसला अखेरच्या क्षणी राजेश लाटकर यांना नाईलाजाने पाठिंबा जाहीर करावा लागला. पण या सर्व घटनेमुळे सतेज पाटलांना मात्र खूपच धक्का बसला आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
पक्षातील वरिष्ठांनी राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पण अखरेच्या क्षणी मधुरिमाराजेंनी माघार घेतल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघातच काँग्रेसची नाचक्की झाली. त्यामुळे सतेज पाटील चांगलेच संतापले होते. मधुरीमाराजे यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. “दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली, जर लढायचे नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती. मी माझी ताकद दाखवली असती, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
कोल्हापुरात झालेल्या या हायव्होल्टेड ड्राम्यानंतर सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतेज पाटलांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. “माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो, मला काही माहीत नाही. जे काय झालं ते तुमच्या समोर आहे,” असं म्हणत भाषणाला सुरुवात केली. पण त्यांचा कंठ दाटून आला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ‘सतेज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी केली.
त्यानंतर एका पदाधिकाऱ्याने उठून कार्यर्त्यांची गर्दी पाहून आणि पाठिंबा पाहून सतेज पाटलांच्या डोळ्यात आश्रू आल्याचं सांगत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं. “जे काही घडलं त्यावर मी आज काही बोलणार नाही. मात्र जे घडलं त्याला समोरे जाण्याचं समर्थ्य तुम्ही मला द्यावं अशी माझी विनंती आहे,” असं सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा :
“मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?”
बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला