क्रेझ नाही तर मॅडनेस..! धोनीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांची जड्डूने घेतली शाळा

आयपीएलचा(audience examples) 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात सीएसकेने दमदार विजय मिळवला. कोलकाताने दिलेल्या 138 धावांच्या आव्हान पार करताना चेन्नई संघाने अवघ्या 17.4 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून सामना जिंकला. त्यामुळे आता चेन्नईच्या विजयाची गाडी रुळावर आली आहे. चेन्नईचा संघ पाच सामन्यातील तीन विजयासह चौथ्या स्थानावर आहे.

तर कोलकाता दुसऱ्या स्थानी कायम आहे. अशातच आता थाला धोनीची(audience examples) क्रेझ पुन्हा एकदा चेपॉकवर पहायला मिळाली. अखेरच्या तीन धावा हव्या असताना चेपॉकवर धोनीला बॅटिंगला पाठवा म्हणून जोरदार मागणी झाली. त्यावेळी मैदानात नेमकं काय काय घडलं? त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

झालं असं की, चिन्नास्वामी स्टेडियमच्या स्लो पीचवर चेन्नईच्या बॉलर्सने चतूर गोलंदाजी केली अन् कोलकाताला 137 धावांवर रोखलं होतं. त्यामुळे चेन्नईसाठी विजय सोपा झाला होता. कोलकाताचा स्पिन अटॅक मजबूत असल्याने पावर प्लेमध्येच चेन्नईने धावा कुटल्या अन् विजयाकडे वाटचाल केली. कॅप्टन ऋतूराज गायकवाडने अप्रतिम फलंदाजीची किमया दाखवली. शिवम दुबेच्या 28 धावांच्या खेळीमुळे चेन्नईने धावा खोऱ्याने काढल्या. त्यामुळे अखेरच्या तीन ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 3 धावांची गरज होती. त्याचवेळी चेन्नईचं पब्लिक ओरडलं, ते धोनीच्या नावाने…

हजारो रुपये मोजलेत अन् धोनीची बॅटिंग पहायला नाही मिळाल्यास प्रेक्षकांना हिरमोड होणारच की… धोनीने फलंदाजीला यावं म्हणून चेपॉकवर चाहत्यांनी एकच कल्ला सुरू केला. शिवम दुबे किंवा ऋतुराज बाद व्हावा, याची प्रतिक्षाच अनेक चाहते करत होते. मात्र, दोघांच्या फलंदाजीवरून धोनीला काय आज पाहता येणार नाही, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, वैभव अरोराच्या एका बॉलवर शिवम दुबे बाद झाला अन् चाहत्यांची उत्सुकता पुन्हा वाढली.

https://twitter.com/i/status/1777553941292626213

फलंदाजीला कोण येणार? याची कुणकुण चेपॉकवर सुरू झाली. शिवम बाहेर निघाला अन् सर्वांच्या नजरा चेन्नईच्या ड्रेसिंग रुमकडे लागल्या. तितक्यात जडेजाने शाळा केली. जडेजा मैदानात येण्यासाठी निघाला अन् चाहत्यांनी एकच कल्ला केला. जडेजाला दोन पाऊलं चालला अन् थेट माघारी फिरला.

फलंदाजीसाठी धोनीच येणार होता. मात्र, जडेजाने प्रेक्षकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. जडेजा ही धमाल पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफलाही हसू आवरता आलं नाही. तर पुढच्याच क्षणी धोनीला पाहून प्रेक्षकांनी आणखी जोराने आवाज करत त्याचं स्वागत केलं. धोनीच्या चाहत्यांचा मॅडनेस इतका होता की, आँद्रे रसलला कान बंद करावे लागले. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला येतोय मुखवट्यांचा “बोहाडा”…

अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम तुरुंगातच, दिल्ल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

मोठी बातमी! काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील ‘Not Reachable’