माफियांच्या हत्ये परिणाम:काही मतदारसंघात 30 वर्षांनी प्रचाराला गेली नेते मंडळी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर (answer)प्रदेशात माफियांचा प्रभाव फारच कमी झालाय. माफिया मुख्तार अन्सारीची तुरुंगात हत्या झाल्यानंतर घोसी मतदारसंघाचे वातावरण बदलून गेलेय.

मऊ मतदारसंघातून मुख्तारचा मुलगा व सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे (सुभासपा) आमदार अब्बास उमेदवार आहेत. तो तुरुंगात अाहे. त्याची भाजपशी युती अाहे. गाझीपूरमध्ये अन्सारी परिवाराच्या दहशतीची यंदा परीक्षा आहे(answer). गेल्या वर्षी पोलिस कस्टडीत अतिक अहमद व त्याच्या भावाची हत्या झाली होती. तेव्हापासून प्रयागराज शांत झाले आहे. जौनपूरमध्ये बाहुबली आमदार धनंजय सिंह तुरुंगात व त्याची पत्नी बसपाची उमेदवार अाहे. कैसरगंजमध्ये बृजभूषण शरणसिंहला अजून भाजपने तिकीट दिलेले नाही.

धनंजय सिंह : स्वत: तुुुरुंगात, पत्नीला तिकीट, काळ्या कारची मात्र दहशत

जौनपूरमध्ये धनंजय सिंह याच्या काळ्या गाड्यांची दहशत असते. दोन दिवसांपूर्वी धनंजय सिंह याची पत्नी श्रीकला रेड्डीने १०० काळ्या कारचा ताफा घेऊन रॅली काढली होती. हे दृश्य एखाद्या सिनेमासारखे भासत होते. अपहरण व वसुलीच्या प्रकरणात ७ वर्षांची शिक्षा झालेला माजी खासदार धनंजय सध्या तुरुंगात आहे. त्याची तिसरी पत्नी व जिल्हा पंचायतीची अध्यक्षा श्रीकला रेड्डी बसपाकडून निवडणूक लढवत अाहे. तेथूनच तो निवडणुकीचे नेटवर्क हाताळतोय. या भागातील लोक त्याच्या दहशतीखाली आहेत.

अतिक अहमद : कुणी नावही घेत नाही; लोक म्हणतात आवडत्या नेत्यालाच मत

अलाहाबाद मतदारसंघात अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ याची दहशत असायची. या शहरातील जुने नेते सांगतात की, अतिकचा दबदबा असणाऱ्या करैली, चकिया, सुलेमसराय व हटवा भागात त्याच्या परवानगी नंतरच प्रचार करण्याची मुभा मिळायची. काही भागात तर गेल्या ३० वर्षांत विरोधी गटाचा नेते प्रचारालाही गेलेला नव्हता. ज्येष्ठ पत्रकार अनुपम मिश्रा यांच्या मते, अतिकच्या हत्येनंतर आता येथील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. आता त्याचे नेटवर्क मोडून पडलेय. या भागातील लोक आता म्हणतात, ‘आवडत्या नेत्याला मत देणार.’

मुख्तार अन्सारी : तीनदा तुरुंगातून विजयी, विरोधक प्रचारालाही जाऊ शकत नव्हतेे

पूर्व उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघातील ‘सुभासपा’चे अरविंद राजभर हे एनडीएचे उमेदवार आहेत. याच भागातील मऊ विधानसभा मतदारसंघातून मुख्तार अन्सारी जिंकायचा. सलग तीन वेळा तर तुरुंगात असूनही तो विजयी झाला. २०१७ मध्ये त्याच्याविरुद्ध निवडणूक लढवणारे भाजप नेते अशोकसिंह सांगतात, त्याच्या भागात दुसऱ्या पक्षाचे नेते प्रचाराला गेले की मुख्तारचे साथीदार त्यांच्या गाडीला अक्षरश: घेराव घालायचे. दहशतीमुळे जनताही जवळ येत नव्हती. २० ते २५ बूथवर तर पोलिस एजंटही नेमणे मुश्कील व्हायचे. मुख्तारचे गाझीपूरमध्येही असेच नेटवर्क होते.

पूर्वांचलमधून दबंग गायब, काही तुरुंगात गेल्याने बदल

उत्तर प्रदेशातील पहिला माफिया हरिशंकर तिवारीची गोरखपूर, डुमरियागंज, महराजगंज भागात दहशत होती. मात्र दीर्घ आजाराने त्याचा मृत्यू झाल्यानंतर मात्र येथील वातावरण बदलले. आजमगडमध्ये रमाकांत व उमाकांत यादव या भावांचीही दहशत होती. रमाकांत सपा, बसपा, भाजपकडून निवडणूक जिंकला होता, तर उमाकांत २००४ मध्ये मछलीशहरमधून जिंकला. अपहरणाची अनेक गुन्हे असल्याने दोघेही तुरुंगात आहेत. संभल, बंदायू, बुलंदशहरमध्ये प्रभाव असलेल्या डीपी यादवचा दराराही संपलाय.

हेही वाचा :

2009 ची पुनरावृत्ती होणार अन्…; संजय मंडलिक यांचा मोठा दावा

प्रचार गीतातून ‘जय भवानी’, ‘हिंदू’ शब्द काढा.. निवडणूक आयोगाचे पत्र; उद्धव ठाकरेंचा दावा

विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, पण..; वसंतदादांचा दाखला देत काय म्हणाले संजय राऊत?