हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पूजा विधीला एक वेगळे महत्त्व असते. प्राचीन (maha shivaratri)काळापासून चालत येणाऱ्या या परंपरांपैकी एक म्हणजे शिवलिंगासमोर भाविक तीन वेळा टाळी वाजवतात. तुम्ही कधीही मंदिरात पूजा करताना 3 वेळाटाळी वाजवणारे लोक पाहिले आहेत का? ही एक प्राचीन परंपरा असून तिचे एक विशिष्ट कारण आहे. शिवालयात 3 वेळा टाळी वाजवल्याने महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. तर मग शिवरात्रीची पूजा करण्यापूर्वी तुम्हीदेखील जाणून घ्या यामागील कारण काय आहे?

महादेवाच्यामंदिरात 3 वेळा टाळ्या वाजवण्याचे महत्त्व
शास्त्रानुसार,3 वेळा टाळी वाजवण्याचे वेगवेगळे अर्थ असतात. वास्तू आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, हे एका विशेष विधीचा भाग आहे.
- पहिली टाळी
ही टाळी म्हणजे आपण मंदिरात पोहोचलो (maha shivaratri)असल्याचे महादेवांना कळविण्यासाठी असते. आपण भक्तीभावाने त्यांच्यासमोर उपस्थित असल्याचा संदेश ही टाळी देते. - दुसरी टाळी
ही टाळी आपल्या मनोकामनांसाठी असते. आपण आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर व्यक्त करतो. - तिसरी टाळी
ही टाळी म्हणजे “हे महादेव, आम्ही आमच्या इच्छा तुमच्यासमोर व्यक्त केल्या, पण आमच्यासाठी योग्य काय आहे, ते तुम्हीच ठरवा” अशी प्रार्थना असते. यामध्ये महादेवावर संपूर्ण विश्वास दाखवला जातो.
आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले टाळी वाजवण्याचे फायदे
टाळी वाजवल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो.
संधीवाताच्या समस्येपासून बचाव करता येतो.
हृदयासंबंधी आजारांवर मात करता येते.
फुफ्फुसांचे कार्य योग्य गतीने होते.
शिवपुराणानुसार 3 टाळ्यांचे महत्त्व
शिवपुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये 3 वेळा टाळी वाजवण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
रावणाने भगवान शिवाची पूजा करताना 3 वेळा टाळ्या वाजवल्या होत्या, त्यामुळे त्याला लंकेचे राज्य मिळाले.
भगवान श्रीकृष्णाने संततीच्या प्राप्तीसाठी महादेवाचा अभिषेक केला आणि 3 टाळ्या वाजवल्या होत्या.
श्रीरामाने समुद्रावर सेतू बांधताना 3 वेळा टाळी (maha shivaratri)वाजवली होती आणि नल-नील यांच्या मदतीने रामसेतू तयार झाला.
महाशिवरात्रीला 3 टाळ्या वाजवून महादेवांची कृपा मिळवा!
यंदाच्या महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी 2025 रोजी जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा कराल, तेव्हा बेलपत्र, गंगाजल, धतूरा किंवा अन्य पूजेचे साहित्य नसेल, तरीही फक्त शिवालयात जाऊन श्रद्धेने 3 वेळा टाळी वाजवा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. श्रद्धेने 3 वेळा टाळी वाजवायला विसरू नका. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढेल आणि महादेवांची कृपा कायम तुमच्यावर राहील.
हेही वाचा :
राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्या अपघाताचा व्हिडीओ समोर!
केस ओढले, मारहाण केली, शिवाय आक्षेपार्ह…’त्या’ दिवशी काय घडलं?, ऐश्वर्याचा मोठा खुलासा
IPL 2025 ची सुरुवात कधी पहिल्या सामन्यासाठी दोन संघ ठरले संपूर्ण वेळापत्रक जाहीर