महादेव बेटिंग अॅप्स प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (investigation) 40 तास ऑपरेशन हाती घेऊन अभिनेता साहिल खानला छत्तीसगड येथून अटक केली. साहिल हा ‘लोटस बुक 24/7’ या बेटिंग अॅप्स वेबसाईटचा भागीदार आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
महादेव बेटिंग अॅप्सच्या माध्यमातून ऑनलाईन बेटिंग केली जाते. यातून (investigation)मिळणारा पैसा हा बेनामी खात्यात वळवला जातो. ऑनलाईन जुगार खेळून कोणताही कर न भरता 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली गेली होती. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात 32 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच या गुह्याची व्याप्ती पाहता त्याच्या तपासासाठी खास एसआयटी स्थापन केली गेली होती.
अभिनेता साहिल खानवर ‘लायन बुक अॅप्स’चे प्रमोशन करणे आणि त्यासाठी इव्हेंटला हजर राहण्याचे आरोप आहेत. लायन बुक अॅप्स झाल्यानंतर ‘लोटस बुक 24/7’ हे अॅप्स सुरू केले गेले. त्या अॅप्सच्या दुबईमध्ये पाटर्य़ा होत असायच्या. त्या पार्टीमध्ये काही बॉलीवूडचे सेलिब्रेटी हजर राहत. महादेव बेटिंग अॅप्स प्रकरणी पोलिसांनी साहिल खानची चौकशी केली होती. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अटक होईल या भीतीने साहिल पळून गेला होता. साहिल हा पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील, पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, शिंदे, ननावरे, थोरात, पासी, जगदाळे, शुक्ला आदींच्या पथकाने तपास सुरू केला.
साहिल खान हा अभिनेता असून एका हिंदी चित्रपटात त्याने काम केले होते. चित्रपटात खास कामगिरी न करू शकल्याने त्याने फिटनेसवर अधिक भर दिला. त्याने एक न्युट्रिशियनची पंपनी सुरू केली.
साहिल हा मुंबई येथून गोवा येथे गेला. तेथे एका हॉटेलमध्ये तो काही तास राहिला. पोलिसांचे पथक गोव्याला गेले. मात्र पोलीस येण्याच्या पूर्वीच तो तेथून निघून गेला. साहिलला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी स्थानिक वाहनाचा वापर केला. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गडचिरोली येथून तो छत्तीसगड येथे गेला. तेथे तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याची माहिती समजताच पोलीस त्या हॉटेलमध्ये गेले. त्या हॉटेलमधून पोलिसांनी साहिलला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. ते दोन मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार आहेत. त्या मोबाईलमुळे पोलिसांना आणखी माहिती मिळणार आहे. साहिल हा कोणाच्या संपका&त होता, त्याला किती पैसे मिळाले होते, त्याने त्या पैशांचे काय केले, याचा तपास पोलीस करणार आहेत. साहिलला अटक करून आज मुंबईत आणले. त्याला आज भोईवाडा येथील न्यायालयात हजर केले होते. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. सत्य लवकरच समोर येईल, असे अभिनेता साहिलने न्यायालयात जाताना प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा :
मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी ठाकरे गट म्हणतो, ‘गुजरातला वेगळा.
मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका
महिलेच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक