डोंबिवली – बदलापूरात शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार घटनेच्या(protest) निषेधार्थ 24 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी बॅनर बाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लेकी बाळी साठी हा बंद पुकारण्यात आला असून सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डोंबिवलीत महाविकास आघाडीकडून शहरात (protest)ठीक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. बदलापुरात दोन लहान चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सर्व देशात संतापाची लाठ पसरली आहे. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील मणी सर्व स्तरावरून केली जात आहे.
या घटनेच्या निषेधार्थ उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकासाकडून देण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडू नये आणि महाराष्ट्रातल्या लेकी-बाळीच्या सुरक्षेसाठी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद करावा अशी मागणी महाविकास आघाडी कडून केली जात आहे. याचेच बॅनर आता डोंबिवली शहरात ठीक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक सेवांवर त्यांचा परिणाम दिसून येईल. चाकरमान्यांना या बंदचा फटका बसू शकतो.
‘मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे.’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. हा राजकीय पक्षांचा बंद नाही. आपल्या माता-भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे. कुणीही असं दुष्कृत्य करण्यास धजावू नये आणि असं काही झालंच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावा यासाठी हा बंद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील एसटी महामंडळ आणि रेल्वे सेवेवर या बंदचा परिणाम दिसू शकतो. मुंबईत लोकल सेवेवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते. तर बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. खबरदारी म्हणून या सेवांना राज्यात काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. बंदच्या माध्यमातून विरोधक ताकद दाखवण्याची शक्यता आहे.
हा राजकीय बंद नसल्याचे अगोदरच महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे. उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला मार्केट, इतर दुकाने बंद असतील. दूध विक्री, भाजीपाला विक्री आणि किराणा सामानाची दुकानं, हॉटेल्स बंद राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री दोन तास बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
जालना काँग्रेसच्या उद्याजालना बंदची हाक(protest) देण्यात आलीये.. बदनापूर प्रकरण आणि कोलकाता येथे झालेलं हिसांचार प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालये आणि शाळा याठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी संगिता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 22, 2024
उद्या आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात जालना बंदची हाक देण्यात आली असून व्यापार्यांनी सहकार्य करावं असंही संगिता गोरंट्याल यांनी म्हंटलंय.. दरम्यान बदलापूर प्रकरणात एका महिला पत्रकाराला अपमानास्पद शब्द वापरल्या प्रकपणा माजी नगराध्यक्षा विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी संगिता गोरंट्याल यांनी केली आहे.
हेही वाचा:
महिला सुरक्षा उपाययोजना: नवीन पुढाकार आणि राज्यव्यापी सुधारणा
लहान मुलांचे महत्व आणि संस्कार: श्रीकृष्णाच्या लीलांपासून शिकण्याचे धडे
मनसेच्या बैठकीत गोंधळ; उमेदवारीच्या निर्णयावर हाणामारी, राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर वाद चिघळला