कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मनात”मतलब”ठेवून काही राजकारणी, जात वाद जोपासणाऱ्या काही व्यक्ती यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचा शत्रू औरंगजेब यांना वापरले जात आहे. सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जातो आहे. या मंडळींचा इतिहास हा विषय अतिशय कच्चा असल्याने महाराष्ट्र इतिहास परिषदेने या मंडळींचे प्रबोधन करावे किंवा त्यांचे खास वर्ग घेऊन त्यांना “धडे” शिकवावेत. कारण वादग्रस्त विषय उकरून काढण्याची डेली सोप प्रमाणे न संपणारी मालिकाच सध्या महाराष्ट्राच्या राजकीय (politicians)पडद्यावर सुरू आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या “छावा” चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे गद्दार कोण होते याची चर्चा सुरू झाली. फ्रान्सिस मार्टिन म्हणतोय त्याप्रमाणे हा गद्दार सरकारकून ब्राह्मण होता. तर तर या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणतात की गणोजी व कानोजी हे बंधू गद्दार होते(politicians). हा वाद सुरू असतानाच तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर हा छत्रपती घराण्यावरच घसरून काही संतापजनक बरळला. त्यातच काही तथाकथित विद्वान मुस्लिमांनी औरंगजेब चे गुणगान सुरू केले. मग क्रूर कर्मा औरंग्याची कबरच उघडून टाका अशी मागणी होऊ लागली. आता तर औरंग्याच्या आजच्या वंशज यांनी खुलताबाद मधील कबर सुरक्षित ठेवा अशी मागणी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवून केली आहे.
काँग्रेसचे एक नेते हुसेन दलवाई यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृति मध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार ठार मारण्यात यावे अशी सूचना तत्कालीन पंडितानीच औरंगजेब याला केली होती असा एक नवीनच शोध त्यांनी लावला आहे. त्यांच्या या वक्तव्याची कुणीही फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याची मागणी करून एका नव्या वादाला फोडणी दिली आहे. वाघ्या कुत्रा याचे पुरावे इतिहासात सापडत नाहीत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी परिसरात असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी विना विलंब काढून टाकण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे, सुमारे 13 वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेड ने अशाच प्रकारची मागणी करून रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प तोडून टाकले होते. तेव्हा इसवी सन 2012 मध्ये संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांच्या या तोडफोडी बद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याची दखल घेऊन तत्कालीन काँग्रेस सरकारने आहे त्याच ठिकाणी वाघ्या कुत्र्याचे दुसरे शिल्प बसवले.

आता या वाघ्या कुत्र्याचे शिल्प पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आणले गेले आहे. इतिहासातील कागदपत्रांमध्ये वाघ्या कुत्र्याचे संदर्भ कुठे आढळून येत नाहीत. म्हणून ते शिल्प तातडीने काढून टाकण्यात यावे. अशी मागणी संभाजी राजे छत्रपती यांनी केल्यानंतर काही संघटनांनी त्यांच्या या मागणीला आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी तंत्रामध्ये कुत्र्यांना वापरले होते.
शत्रु सैन्याची दिशाभूल करण्यासाठी कुत्र्यांचे कळप पळवण्यात आले होते असे काही पुरावे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे शिल्प काढण्यात येऊ नये अशी त्या मंडळींची मागणी आहे(politicians). तर मल्हारराव होळकर यांच्या आजच्या वंशजानीही वाघ्या कुत्र्याचे शिल्प हा अकारण वादाचा विषय बनवला जात असल्याचे म्हटले आहे. आज ज्यांना इतिहास संशोधक म्हणून लोक मान्यता आहे त्यांनी पुढे येऊन वाघ्या कुत्र्या विषयी नेमकी माहिती दिली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत हा वाघ्या कुत्रा होता किंवा नाही याबद्दल या इतिहास संशोधकांनी स्पष्ट खुलासा केला पाहिजे. महाराष्ट्र इतिहास परिषदेने किमान यामध्ये पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रात सध्या ऐतिहासिक घटनांवरून ज्या प्रकारे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामध्ये इतिहास संशोधकांनी व्यक्त होऊन नेमकी वस्तुस्थिती आणि नेमका इतिहास पुढे आणला पाहिजे. इतिहास परिषदेने तर महाराष्ट्रातील मतलबी राजकारणी आणि काही जात वाद जोपासणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी खास वर्ग घेऊन त्यांना इतिहासाचे धडे”देणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
ईदच्या नमाजावरून वाद! रस्त्यावर नमाज पढल्यास पासपोर्ट रद्द होणार
31 मार्च डेडलाईन! ‘या’ 5 गोष्टींसाठी शेवटची संधी, चुकल्यास मोठे नुकसान!
अरे डोळे फुटले का? भररस्त्यात कारने अडीच वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले, थरारक दृश्ये…