कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकीय अस्थिरता, सामाजिक अशांतता निर्माण (achieve) करण्यासाठी सध्या महाराष्ट्रात प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला सर्वच राजकीय पक्षांचा हातभार लागतो आहे. विधानसभा निवडणुकांपर्यंत मतांचे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण केले जाईल. त्याची सुरुवात गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा सर्वात गंभीर परिणाम उद्योगावर होणार आहे. इथल्या उद्योगांचे शेजारच्या राज्यात स्थलांतर होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एकमेकास खिंडीत पकडण्यासाठी बेभान झालेल्या राजकारण्यांना दुर्दैवाने त्याचे भान आहे असे दिसत नाही.
बघून घेतो, सोडत नाही, एक तर मी राहीन किंवा तू, अपशकूनी, कुत्र्याची औलाद, कानाखाली(achieve) आवाज काढेन, गाल लाल करेन, पाठीवर वळ उठतील, माझी पोर काय करतील हे तुला कळणारही नाही, माझ्या नादाला लागू नका, नादाला लागाल तर सोडणार नाही, अशी चिंथावणीखोर, भडक भाषा महाराष्ट्रातील बहुतांशी राजकारण्यांच्याकडून ऐकवली जात आहे. आणि कुठे तणाव निर्माण झाला तर हीच मंडळी शांततेचं आवाहन करताना दिसतात. राजकारण्यांचा हा दुटप्पीपणा राज्यात अशांतता निर्माण करू पाहत आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण राज्यभर आहे. जमेल तसा प्रचारही सध्या सुरू आहे. नेत्यांच्याकडून आरोपांचा चिखल तुडवला जातो आहे, त्यात सकल मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या घटक पक्षांना धारेवर धरले आहे. आता त्यांनी राज्यातील 113 विधानसभा जागावरील प्रस्थापित आमदारांना पाडणार असल्याचे जाहीर केले आहे. हे मतदारसंघ कुठले आणि कोणाचे आहेत?
महायुतीचे त्यामध्ये किती आहेत आणि महाविकास आघाडीचे त्यामध्ये किती आहेत? याचे तपशील मात्र त्यांनी जाहीर केलेले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार आहेत असे गेल्या काही महिन्यांपासून उघडपणे बोलले जात आहे. त्याचे निराकरण करण्याचा एक अल्पसा प्रयत्न त्यांनी केला असून”पावसात भिजा किंवा उन्हात झोपा”त्याचा काही उपयोग होणार नाही अ हेसे ते एका जाहीर सभेत बोलले. आपण शरद पवार यांच्यावरही टीका करण्यास मागेपुढे पाहत नाही असा एक संदेश त्यांना द्यावयाचा होता असे वाटते.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे वादग्रस्त विधान केल्यानंतर मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्यासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. वातावरण तंग केले. त्यानंतर त्यांच्या गाडीसमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ुपार्या फेकल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून, माझ्या नादाला लागू नको, माझी पोर काय करतील हे मला कळणारही नाही, तुझे गाल लाल होतील असा इशारा दिल्यामुळे मनसे सैनिक विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष ठीक ठिकाणी पाहायला मिळतो आहे.
जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्या गाड्यांवर यापूर्वी हल्ले झालेले आहेत. आता राज ठाकरे यांच्यासमोर निषेध मोर्चे होत आहेत. जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत असे राज ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले आहे आणि त्याबद्दल शरद पवार किंवा ठाकरे यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.
ठाकरे गटाचे संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे नितेश राणे हे एकमेकांचा शब्द खाली पडून द्यावयास तयार नाहीत. दोघांचीही भाषा खालच्या स्तरावरची आहे. तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुका, आरोपांची चिखल फेक, मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न, संसदेत मांडले गेलेले वक्फ सुधारणावादी विधेयक, त्यातून अस्वस्थ झालेला मुस्लिम समाज, विशाळगड प्रकरण, यामुळे महाराष्ट्रातील वातावरण कायदा व सुव्यवस्था राखाणारे आहे असे म्हणता येणार नाही.
हेही वाचा :
सांगलीत आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा
ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरात पडसाद; संतप्त कार्यकर्त्यांनी मनसेचे बॅनर फाडले
“माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा खुलासा!