गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर ; अंबादास दानवेंची परखड टीका

मुंबई: महाराष्ट्रात एकूण ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे नोंदवले गेले असून, हा दर १०.२% इतका आहे(political news). त्यामुळे महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरात स्त्री अत्याचाराचे ४ लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले असून, त्यातील ४५ हजार गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. अॅसिड हल्ले, सायबर गुन्हे यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याने महिलांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

दिलीप यांनी सरकारच्या “लाडकी बहीण योजना” वर टीका करताना सांगितले की, “महिलांचे संरक्षण(political news) करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.” त्यांनी मुख्यमंत्री यांचा बुलडोझर फक्त काही भागात चालत असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याची परखड टीका केली.

दानवे यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, “हे सरकार मोठ्या घोषणांमध्ये अडकून आहे, जे सर्वसामान्यांसाठी नव्हे तर कंत्राटदारांच्या हितासाठी आहेत. गृह विभागाचे अधिकारी जनतेच्या पैशाचा अपव्यय करून राज्याला अधोगतीकडे नेत आहेत.”

राधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ देण्यावर सवाल उपस्थित करताना, दानवे म्हणाले, “समृद्धी महामार्गाच्या कामात मोपलवारांना मुदतवाढ का दिली गेली?” त्यांनी अलिबाग आणि सिंधुदुर्ग कॉरिडोरच्या विकासाच्या नावाखाली भूसंपादन करून जमिनी विकण्याच्या व्यवसायावरही टीका केली.

ग्रामीण भागात गर्भलिंग चाचणी आणि गर्भपाताच्या घटना, नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणातील संथगती तपास, आणि ऊर्जा विभागातील भ्रष्टाचार याबाबतही दानवे यांनी सरकारवर कठोर टीका केली. त्यांनी सरकारने अल्पसंख्याक विभागाला कोणत्याही सुविधा दिल्या नसल्याचा आरोप केला आणि माहिती व जनसंपर्क विभागात ब्रिजेश सिंग यांची नियुक्तीवर सवाल उपस्थित केला.

दानवे यांच्या या जोरदार टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे, आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हेही वाचा :

WhatsApp ने रोलआउट केला नवीन तगडा फिचर!

कोल्हापूरच्या शेतकरीपुत्राची सीए परीक्षेत घवघवीत यश मिळवत झेप

आज ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार, पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार