महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; सांगलीत कोण?

आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची(formula) संयुक्त पत्रकार परिषद शिवालय कार्यालयात पार पडत आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच इतर घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमधून शिवसेना – 21, काँग्रेस – 17, राष्ट्रवादी – 10 असा फॉर्म्युला फिक्स करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या जागा: नंदुरबार, धुळे, अकोला,अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया ,गडचिरोली(formula) चिमूर,चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर , रामटेक, उत्तर मुंबई अशा १७ जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गट– बारामती, शिरूर, सातारा, दिंडोरी, माढा,रावेर, अहमदनगर, बीड, वर्धा, भिवंडी, या १० जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार आहे.

ठाकरे गट: बुलढाणा, यवतमाळ, मावळ, सांगली, हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, शिर्डी, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण, कल्याण, हातकणंगले, पालघर, जळगाव, अशा २१ जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

समोस्यामध्ये चक्क कंडोम, गुटखा आणि खडे, ऑटो कंपनीमध्ये घडतंय तरी काय?

काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

‘सांगली’त गोंधळ, ‘हातकणंगले’त चिंता; शिवसेनेकडून काँग्रेसची अभूतपूर्व कोंडी