कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी(election)उमेदवाराचा शोध घेण्याची धडपड महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये सुरू आहे. सध्याच्या आमदारांची उमेदवारी निश्चित करण्याबाबत काँग्रेसमध्येच संभ्रम आहे, तर महायुतीमध्ये अनेक दावेदारांमुळे उमेदवारी कोणी मिळवेल याबाबत साशंकता आहे.
गेल्या काही वर्षांत कोल्हापूर शहरात शिवसेनेने पाच वेळा आणि काँग्रेसने तीन वेळा बाजी मारली आहे, परंतु सध्याच्या स्थितीत महायुतीकडून काँग्रेसला तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसमध्ये जयश्री जाधव यांची उमेदवारी पुन्हा मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच, महायुतीकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम, खासदार पुत्र कृष्णराज महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे, आणि अजित पवार गटाचे महानगर अध्यक्ष आदिल फरास यांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
सर्वच पक्षांत उमेदवार निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग आलेला असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणूक लढतीचा रंगतदार सामना होणार आहे.
हेही वाचा:
योगाभ्यास करताना आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी खालील पाच गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे:
शिवरायांचा अपमान करणाऱ्या सरकारविरोधात महाविकास आघाडीचे ‘जोडे मारा’ आंदोलन
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, १५ वर्षीय मुलगी गरोदर