‘महाविकास आघाडीला राज्यात 31 ते 32 जागा मिळतील’

लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये (Hall)म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स.

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्राकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं (Hall)प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा…

देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळी सातपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून मुख्य मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी 84 टेबल वर ईव्हीममधील मतमोजणी होईल तर 20 टेबलवर पोस्टल बलेटची मतमोजणी होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या होणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजपा अशी थेट लढत पहायला मिळणार आहे.

कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ठाकरे गटाच्या उमदेवार वैशाली दरेकर यांनी मतमोजणी केंद्रात सकाळीच दाखल झाल्या आहेत. ‘जनतेनं पेपर लिहिला असल्याने धाकधूक नाही मात्र उत्सुकता कायम आहे. या मतदारसंघातून मशाल लोकसभेत जाणार,’ अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली.

अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज सकाळी साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं. नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे असा थेट सामना आहे. या मतदारसंघातून प्रहार संघटनेचे दिनेश बूब तसेच वंचितकडून आनंदराज आंबेडकर निवडणूक लढवत आहे.

कोकणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाचे पोस्टर्स त्यांच्या दिल्लीतील घराबाहेर झळकले आहेत. विशेष म्हणजे निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्यांना विनायक राऊत यांचं अभिनंदन करणारे हे पोस्टर्स झळकावले आहेत.

‘शिरुर मतदारसंघात नक्कीच तुतारी वाजेल. शरद पवार गटाने लढवलेल्या 10 जागांपैकी किमान आठ जागा तरी निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे,’ असं शिरुरमधून निवडणूक लढवणारे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. तसेच या जागा वाढूही शकतील असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीला किमान 31 ते 32 जागा मिळतील, असा विश्वासही कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

मतमोजणी केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळल्यास कुठे करू शकता तक्रार?

अठराव्या लोकसभेचा सत्ताधारी आज ठरणार;

भाजपविरुद्ध 17 तक्रारी,मात्र त्यावर काहीच नाही; उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश