महाविकास आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन; महिलांवरील अत्याचारांविरोधात जोरदार निषेध

भरपावसात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात शनिवारी महाविकास आघाडीने राज्यभरात मूक आंदोलन केले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हजारो नागरिक तोंडाला काळी पट्टी लावून आणि हातात काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. यावेळी ‘आंधळे बहिरे महायुती सरकार…महिलांवर होतायत अत्याचार’, ‘लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे’ अशा जोरदार घोषणाबाजीने सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करण्यात आला.

विशेषतः बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचारांवर प्रतिक्रिया देताना, मराठवाडा जिल्ह्यातील नागरिकांनी पावसातही संघर्ष सुरू ठेवला. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे आणि तोंडाला काळी पट्टी बांधून अत्याचारांचा विरोध केला.

या आंदोलनाने महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर जागरूकता निर्माण केली असून, सरकारने योग्य कारवाईची मागणी करण्यात आली आहे.\

हेही वाचा:

रितेश देशमुख आणि निक्की तंबोळी यांच्यात तणाव: ‘चावीचं माकड’ वाद व्हायरल

सांगली शेतकऱ्यांना दिलासा : ७८.६४ कोटींची मदत थेट खात्यात

महाविद्यालयीन युवतीची छेड, विरोध करणाऱ्यांवर हल्ला; पीएमपीवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर