कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील(meeting) तीनही पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शनाने फोडण्यात येणार होता. कोल्हापुरात मंगळवारी (20 ऑगस्ट) तपोवन मैदानात मोठी सभाही आयोजित करण्यात आली होती. पण प्रचाराचा नारळ फुटण्या आधीच महायुतीची ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तपोवन मैदानावर होणाऱ्या सभेला(meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्रीदेखील उपस्थित राहणार होते. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती. सभामंडपाचे काम सुरू होते. साफसफाई सुरू होती. सर्व नियोजनही आखण्यात आले होते. पण ही सभाच रद्द करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर न झाल्याने ही सभाच रद्द झाल्याची माहिती स्थानिक सुत्रांकडून मिळाली आहे. आता या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत कार्यक्रम घेतला जाऊ शकतो. अशीही माहिती आहे.
विशेष म्हणजे, जिल्हाभरातून 40 ते 50 हजार लाभार्थ्यांसह कार्यकर्ते या सभेला, मेळाव्याला हजर राहणार होते. मागील काही दिवसांपासून आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्याची तयारीला लागले होते. मात्र, अचानक हा मेळावा रद्द करण्यात आला असला तरी पुढील तारीख लवकरच जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
यास विकृती, क्रूरता ऐसे नाव आज कोलकाता, उद्या दुसरेच गाव
काँग्रेसला मोठा धक्का, युवा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर?
सांगलीतील राजकीय रणांगण उफाळले: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-ठाकरे गट संघर्ष तीव्र होण्याची शक्यता