भाईंदर: कोलकत्यामधील डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात(scheme) आली त्यानंतर १० दिवसांनी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाला. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामधून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईंदरमधील महिलांनी(scheme) तहसीलदार कार्यालयात जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले. आम्हाला पैसे नको तर सुरक्षा हवी’ असे या महिलांनी शासनाला ठणकावले आहे, या महिलांची कृती चर्चेचा विषय बनली आहे.
बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेत झालेल्या लैगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप पसरला असून शासनाविरोधात रोष दिसून येत आहे. ठिकठिकाणी सामाजिक संस्थासह राजकीय पक्षाकडून आंदोलन करून निषेध नोंदवला जात आहे. बुधवारी मीरा भाईंदरमध्ये शासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध करण्यात आला. काही महिलांनी भाईंदर पश्चिम येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात गेल्या आणि लाडक्या बहीण योजनेतून मिळालेले पैसे परत केले.
याबाबतची चित्रफित तयार करून त्यांनी ही माहिती दिली. आम्हाला अशा पैशांची गरज नाही. शासनाने आम्हाला केवळ शासनाने सुरक्षा द्यावी असे त्यांनी सांगितले. एकीकडे सरकार मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही आणि दुसरीकडे लाडकी बहिण योजना देऊन भुलवले जात असल्याचा आरोप या महिलांनी केला.
या महिलांच्या कृतीचे समाज माध्यमावर कौतुक होत आहे. दुपारी महिला कार्यलयात आल्या तेव्हा तहसीलदार उपस्थित नव्हते. आपल्याकार्यालयात कोणीही आले नसल्याचा दावा अप्पर तहसीलदार दिनेश गौडं यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेचा निषेध फक्त मीरा भाईंदरमध्ये नाही तर ज्या दिवशी बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती तेव्हा नागरिकांनी या योजनेचा निषेध केला होता आणि सांगितलं होत की, आम्हाला लाडकी बहीण योजना नको सुरक्षा बहीण योजना हवी आहे. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
हेही वाचा:
शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे
Post Office ची जबरदस्त स्कीम; महिन्याला कमवा 20 हजारांपेक्षाही अधिक रुपये
”वर्षा’वर फाशी दिली की राजभवानावर?’ संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल