जॅकलीनच्या प्रेमात झालाय मजनू; सुकेशने खरेदी केला 8 कोटी 45 लाख रुपयांचा ड्रेस! ‘मला तुझ्या चेहऱ्यावर..’

कथित फसवणूकीच्या आरोपाखाली तुरुंगात असणारा सुकेश चंद्रशेखर हा जॅकलिन फर्नांडिसच्या (love)प्रेमात मजून झालाय की काय? असा प्रश्न सर्वांना पडलाय. जॅकलिनवर आपले प्रेम असल्याची कबुली त्याने याआधी दिलीय. आपण जॅकलिनला कोट्यवधीचे गिफ्ट पाठवल्याचेही त्याने अनेकदा सांगितले आहे. आता यात आणखी एका महागड्या गिफ्टचा खुलासा झाला आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलीनसाठी दहा लाख डॉलर्स म्हणजेच 8 कोटी 45 ​​लाख 64 हजार 522 रुपयांचा एक ड्रेस खरेदी केल्याचे वृत्त एका पत्राद्वारे समोर आले आहे.

सुकेशने त्याची कथित गर्लफ्रेंड जॅकलिनसाठी 8 कोटी 45 ​​लाख रुपयांना हा ड्रेस खरेदी केला होता. सुकेशने लिलावात बोली लावून हा खास ड्रेस खरेदी केला.

29 नोव्हेंबर 2024 रोजी जॅकलिन फर्नांडिसला त्याने(love) प्रेमपत्र लिहिले. या प्रेमपत्रात सुकेश चंद्रशेखरने म्हटले आहे की, मी तुझ्यासाठी डिझाइन केलेला एक अतिशय सुंदर ड्रेस पाहिला. जो आता लिलावासाठी ठेवण्यात आला आहे. ते घेण्यापासून मी स्वतःला कसे थांबवू शकतो? कारण हा ड्रेस खूपच सुंदर दिसतोय. जी मला तुला भेट म्हणून द्यायचा आहे.’

सुकेशने जॅकलिनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी या ड्रेससाठी दहा लाख डॉलर्सची बोली लावली आहे. यासाठी पैसा जातोय. तुला माहिती आहे, की तुला स्पेशल फिल करुन देण्यासाठी मी काहीही करेन. मला नेहमी तुझ्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे. जगाला सांगू इच्छितो की मी तुमची कधीही दिशाभूल केली नाही.’ पुढे पत्रात तो म्हणतोय की, ‘मी एक कायदेशीर व्यावसायिक होतो. मी एक कायदेशीर व्यापारी आहे. मी सदैव कायदेशीर व्यावसायिक राहीन. मी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना खुले आव्हान देतोय की, त्यांनी एक तरी गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. मला आशा आहे की, माझा हा हावभाव तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणेल आणि तुला स्पेशल वाटेल.’

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला नुकतेच दिल्ली न्यायालयाने जामिन दिला आहे.कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव घेण्यात येत आहे. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक आणि तेवढ्याच रकमेचा जामीन जमा केल्यानंतर जॅकलिनला जामीन मंजूर केला. अंतरिम जामीन संपल्यानंतर जॅकलीन दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली होती.

हेही वाचा :

महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? ‘त्या’ 13 लाख मतांचं गूढ काय? आव्हाडांची भलीमोठी पोस्ट

एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदम

2024 संपण्याअगोदर ‘या’ कंपनीच्या दमदार कार्स मार्केटमध्ये होणार लाँच