सकाळच्या घाईगडबडीमध्ये रोज रोज डब्यात कोणती भाजी घेऊन जावी हे समजत नाही. अशावेळी अनेक लोक बाहेरून विकत आणलेली भाजी खातात. मात्र सतत बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डब्यात चमचमीत बटाट्याच्या काचऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी(Recipe) सांगणार आहोत.
बटाटा हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. बटाटे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. बटाटे खाल्यामुळे पोटही लवकर भरते. बटाट्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कमीत कमी वेळात जर भाजी बनवण्याची असेल तर सगळ्यात आधी बटाट्याचे नाव घेतले जाते. बटाटा 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच शिजतो आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही. चला तर जाणून घेऊया बटाट्याच्या काचऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी(Recipe).
साहित्य:
- बटाटा
- लाल तिखट
- हळद
- मीठ
- तेल
- कांदा
- हिरवी मिरची
- हिंग
- जिरे पावडर
- आमचूर पावडर
कृती:
- बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे स्वच्छ धुवून त्यानंतर त्याची साल काढून गोलाकार पातळ चिरून पाण्यात ठेवा.यामुळे बटाटे काळे पडणार नाहीत.
- कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात जिरं आणि हिंग टाकून कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- कांदा भाजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित कांदा लाल करून घ्या. कांदा शिजल्यानंतर व्यवस्थित नरम होईल.
- नंतर त्यात चिरून घेतलेले बटाट्याचे काप टाकून वरून लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, गरम मसाला टाकून व्यवस्थित शिजवून घ्या.
- सोप्या पद्धतीमध्ये तयार आहेत बटाट्याच्या काचऱ्या.
हेही वाचा :
छगन भुजबळांना मिळणार मोठी जबाबदारी; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
‘मंत्री करा, अन्यथा..’, ‘या’ आमदारासाठी शिंदे गटात सामूहिक राजीनाम्याची तयारी?
मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी