सकाळचा नाश्ता हा पोट भारण्यासाठीच नाही तर दिवसभर शरीराला(health) ऊर्जा देण्यासाठी सुद्धा केला जातो. मात्र अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी नाश्ता बनवायला कंटाळा करतात.
मात्र यामुळे आरोग्याच्या(health) समस्या उद्भवू शकतात. सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यसाठी फार गरजेचा असतो. त्यातही हा सकाळचा नाश्ता पौष्टिक असला तर सोनेपे सुहागा! आज आम्ही तुम्हाला अशाच एका पौष्टिक नाश्त्यासाठीची एक रेसिपी सांगत आहोत. हा पदार्थ तुम्ही स्नॅक्स अथवा नाश्ता दोन्हीसाठी खाऊ शकता.
हेल्दी म्हटलं की, ओट्स हे नाव समोर येते. मात्र ओट्स हा पदार्थ गाडीचं मिळमिळीत लागतो. मात्र आजची ही रेसिपी अगदी चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. आज आम्ही तुम्हाला ओट्सच्या लाडूंची एक अनोखी रेसिपी सांगत आहोत. हे लाडू चवीला तर उत्तम आहेतच मात्र शरीरसाठीही आरोग्यदायी आहेत. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
- एक वाटी ओट्स
- काजू , बदाम, पिस्ता (सुका मेवा)
- तीळ, तूप
- सुके खोबरे (किसलेले)
- गूळ (काळा गूळ) ऐवजी तुम्ही खारीक पावडर / साधा गुळ / साखर सुद्धा वापरू शकता.
- वेलची, जायफळ
- एक चमचा मेथी दाणे – आवडीनुसार
कृती
- यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये ओट्स भाजून घ्या
- नंतर याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालून यात सुका मेवा म्हणजेच काजू , बदाम, पिस्ता आणि वेलची, जायफळ भाजून घ्या
- त्यानंतर यात किसलेले सुके खोबरे आणि मग मेथी दाणे, तीळ सुद्धा नीट भाजून घ्या (सगळे पदार्थ वेगवगेळे मंद आचेवर भाजून घ्या)
- यानंतर गुळ किसून घ्या
- जर तुम्हाला लाडूमध्ये नैसर्गिक गोडवा हवा असेल तर तुम्ही यात खजूर भाजून त्याची पावडर करून घालू शकता
- सर्व पदार्थ नीट भाजून घेतल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या
- आता या मिश्रणात एक वाटी तूप टाकून नीट एकजीव करून घ्या
- आता एकजीव केलेलं पदार्थ पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्या
- यानंतर या तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या
- तयार लाडू एका हवाबंद डब्ब्यात ठेवा आणि हवे तेव्हा यांचा आस्वाद घ्या.
हेही वाचा :
रतन टाटांचा एक निर्णय… चीनला देखील फुटला घाम…
या अभिनेत्रीने ‘एक्स बॉयफ्रेंड’सोबत उरकला साखरपुडा
बांग्लादेशातील हिंसाचारात भारतीय कंपन्या संकटात; LIC ने घेतला मोठा निर्णय