पावसाळ्यात चहाबरोबर काहीतरी चटपटीत, कुरकुरीत खायची इच्छा होते? मग १० मिनिटांत घरीच बनवा पनीर (paneer)कोळीवाडा! ही एक वेगळी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे जी तुम्हाला नक्कीच आवडेल.

साहित्य:
- पनीर
- बेसन
- तांदळाचे पीठ
- लाल तिखट
- हळद
- आले-लसूण पेस्ट
- लिंबाचा रस
- मीठ
- तेल

कृती:
- पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यात लिंबाचा रस, मीठ, लाल तिखट, हळद, आले-लसूण पेस्ट मिसळून १५ मिनिटे मुरवून ठेवा.
- बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, मीठ आणि पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवा.
- मुरवलेल्या पनीरच्या तुकड्यांना या पेस्टमध्ये बुडवून गरम तेलात तळून घ्या.
- गरमागरम पनीर कोळीवाडा चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
टिपा:
- पनीर कोळीवाडा अधिक कुरकुरीत करण्यासाठी, बेसनच्या पेस्टमध्ये थोडे कॉर्नफ्लोअर मिसळू शकता.
- तुम्ही या रेसिपीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करू शकता.
हेही वाचा :
सांगली: मनपाच्या निदान केंद्रातील अहवाल आता तुमच्या मोबाईलवर मिळवा!
विशाळगड वाद पार्श्वभूमीवर पोलिसांची जिल्ह्यात सतर्कता, सुरक्षा व्यवस्था कडक
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबर अखेर वाहतुकीसाठी खुला होणार