आवडीच्या भाताला आणखीन स्पेशल बनवा घरीच तयार करा शाही पुलाव

विकेंड म्हटलं की नेहमीच काही ना काही स्वादिष्ट आणि टेस्टी खाण्याची इच्छा होते.(veg pulao) बाकी दिवस आपण वाटेल तितकं बोरिंग अन्न खाल्लं तरी चालेल पण विकेंडला मात्र आपण काही नवीन आणि चविष्ट खाण्याचा प्लॅन करतो. तुम्हीही या विकेंडला असेच काही करण्याचा बेत आखला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी सर्वांच्याच तोंडाला पाणी आणेल. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हा पदार्थ आवर्जून ऑर्डर करतो मात्र आता तुम्ही तो घरीच झटपट आणि सोप्या रेसिपीच्या मदतीने तयार करू शकता.

रात्रीच्या जेवणाचे नाव ऐकताच आपल्या मनात रुचकर जेवणाचे चित्र उमटते. रात्रीच्या जेवणात काही खास आणि शाही थाट असेल तर गोष्ट वेगळी होते. अशा परिस्थितीत शाही पुलाव हा एक उत्तम पर्याय आहे, जो केवळ चवीनुसारच नाही तर बनवायलाही खूप सोपा आहे. हा पुलाव तुमचे (veg pulao)रात्रीचे जेवण तर अविस्मरणीय तर बनवेलच, पण तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही त्याची चव दीर्घकाळ लक्षात ठेवतील. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहुयात.

साहित्य

  • बासमती तांदूळ – 2 कप
  • तूप किंवा तेल – 3-4 चमचे
  • बारीक चिरलेला कांदा – 1
  • बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, बीन्स, फ्लॉवर, वाटाणे) – 1 कप
  • चिरलेला सुका मेवा (काजू, बदाम, मनुका) – 1/2  कप
  • दूध – 1 कप
  • केशर – एक चिमूटभर
  • वेलची – 2-3
  • दालचिनी – 1 लहान तुकडा
  • लांब – 2-3
  • तमालपत्र – 1-2
  • मीठ – चवीनुसार
    पाणी – 4 कप
  • कृती
  • यासाठी सर्वप्रथम, बासमती तांदूळ चांगले धुवा आणि 20-30 मिनिटे पाण्यात भिजवा
  • असे केल्याने तांदळाचे दाणे वेगळे होतील आणि पुलावची चव वाढेल
  • यांनतर एका लहान भांड्यात दुधात केशर भिजवा. यामुळे दुधात केशराचा रंग आणि सुगंध येईल, ज्यामुळे पुलाव आणखी खास होईल
  • कुकर किंवा जड तळाच्या भांड्यात तूप किंवा तेल गरम करा. गरम झाल्यावर त्यात वेलची, दालचिनी, लवंगा आणि तमालपत्र घालून हलके परतून घ्या
  • आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून(veg pulao) हलका सोनेरी होईपर्यंत परता
  • नंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या
  • भाजीनंतर त्यात चिरलेला ड्रायफ्रुट्स टाकून हलके परतून घ्या. त्यामुळे पुलावची चव आणखी वाढेल
  • आता त्यात भिजवलेले तांदूळ घालून हलके तळून घ्या. नंतर 4 कप पाणी घालून मीठ घाला. चांगले मिसळा आणि झाकण बंद करा
  • तांदूळ मध्यम आचेवर शिजू द्या. तांदूळ शिजल्यावर आणि पाणी सुकल्यावर त्यात केशर दूध घालून हलकेच मिक्स करा
  • यानंतर यावर झाकण ठेवा आणि मंद आचेवर पुलाव पाच मिनिटे शिजू द्या
  • शेवटी हिरव्या कोथिंबिरीने पुलाव सजवा आणि गॅस बंद करा
  • तुमचा स्वादिष्ट शाही पुलाव तयार आहे, याला गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा

हेही वाचा :

वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा; लाखो बळी जाणार, कारण वाचून हादरून जाल

भाजपचा ‘मास्टर प्लॅन’…, आयकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांची जिंकली मने! आता… 

मद्यधुंद अवस्थेत तरुणाचा धिंगाणा; मोबाईल टॉवरवर चढला अन्… Video Viral