मालवणचा राजकोट आणि राजकारण्यांचा येळकोट!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या राजकोट किल्ला(coat) परिसरात नौ दलाच्या वतीने दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सोमवारी कोसळला आणि राज्यभर संतापाची लाट उसळली. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त होणे स्वाभाविक आहे.

तसे ते झालेही. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम(coat) विभागाच्या वतीने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर ज्यांनी हा पुतळा बनवला ते शिल्पकार जयदीप आपटे, ज्यांनी रचना केली ते अभियंते पाटील यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यासह इतर गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. फिर्याद दाखल करण्याची आणि गुन्हे दाखल करून घेण्याची प्रक्रिया अतिशय तातडीने झाली. याशिवाय नौदल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

आता त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल. हे सर्व होत राहील पण हा भव्य पुतळा कोसळलाच कसा याची कारणे शोधून काढली पाहिजेत. राज्य शासनाने छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा हा नौदलाच्या वतीने उभारण्यात आला होता. असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा केलेला प्रयत्न हा समर्थनीय नाही. केंद्र शासनाने तसेच भारतीय जनता पक्षाने या पुतळा दुर्घटने प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कान पकडले आहेत.

कोणताही पुतळा उभारण्यात आला आणि त्याचे समारंभपूर्वक अनावरण झाले की त्या पुतळ्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जाते. राजकोट किल्ला परिसरात समुद्रकिनारी छत्रपती शिवरायांचा पुतळा भारतीय नौदलाच्या वतीने उभारण्यात आला असला तरी आता त्याची देखभालीची जबाबदारी मालवण पालिकेवर येते.

एखाद्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभा करण्यात आला तर त्याचे रीच समारंभपूर्वक अनावरण होण्यापूर्वी तो पुतळा व्यवस्थित बसवण्यात आलेला आहे, तो पडणार नाही याचे एक प्रकारचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. कारण देशभरात पुतळा कोसळण्याची एकही घटना यापूर्वी झालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचे ऑडिट करावे ही संकल्पना इथे किंवा इथल्या व्यवस्थेत रुजलेली नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना वेदनादायी आहे. अशा प्रकारची पहिलीच घटना महाराष्ट्रात आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या मालवणच्या भूमीत घडावी, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकारण्यांनी या घटनेची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी एकत्र येणे अभिप्रेत होते. प्रत्यक्षात मात्र या पुतळ्यावरून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात राजकारण सुरू झाले आहे.

बुधवारी राजकोट किल्ला परिसराला अर्थात घटनास्थळाला भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मालवणला आले होते. त्याचवेळी महायुतीच्या नारायण राणे गटाचे कार्यकर्तेही तेथे मोठ्या प्रमाणावर जमले आणि तिथे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भयंकर राडा झाला. हाणामाऱ्या झाल्या. खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह राजकोट परिसरात आले. ठाणे का आमदार वैभव नाईक यांनी दोन दिवसापूर्वी आधीच राजकीय तसेच तणावपूर्ण वातावरण तयार केले होते.

म्हणजे राजकोट परिसर हा तणावग्रस्त बनणार याची माहिती किंवा अंदाज स्थानिक पोलिसांना असणे अपेक्षित होते. त्यांनी बुधवारी कडे कोर्ट बंदोबस्त ठेवणे गरजेचे होते. दगडात पोलीस बंदोबस्त असता तर ठाकरे गट आणि राणे गट परस्परांना भिडला नसता.

बदलापूर घटनेनंतर महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन(coat) केले होते. आता हा विषय थोडासा मागे पडत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली आणि एक मोठा मुद्दा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना महायुतीवर टीकेची झोड उठवण्यासाठी मिळाला. मंगळवारपासून महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात ठीक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने सुरू आहेत. मुंबईत शिवतीर्थावर अशा प्रकारचे निषेध आंदोलन करण्यात आले. मालवणच्या घटनेला महायुतीचे भ्रष्ट शासन कारणीभूत आहे असा थेट आरोप महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पुतळा कोसळण्यामागची कारणे अगदी घाईगडबडीने दिली आहेत. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा गेले 138 वर्षे उभा आहे. तर मग छत्रपती शिवरायांचा उभारण्यात आलेला पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळतोच कसा असा रास्त सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
वास्तविक पुतळा कोसळल्यानंतर त्याची तातडीने दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली. संबंधितांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

ही सर्व कायदेशीर प्रक्रिया तातडीने झालेली आहे. त्यामुळे हा पुतळा केवळ आठ महिन्यात कसा कोसळला याची चौकशी करण्यासाठी तज्ञांची कमिटी नेमण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांनी करणे अपेक्षित होते. पण ज्या अर्थी आठव्या महिन्यात पुतळा कोसळतो त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि त्याला भ्रष्टाचार कारणीभूत आहे असा निष्कर्ष तातडीने काढून राज्यभर आंदोलन करण्याची हाक देणे हा राजकारणाचाच भाग म्हटला पाहिजे.

हेही वाचा:

“सरकार उलथवून टाकण्यासाठी एकत्र या”: उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन

क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण: बिटकॉइन, इथेरियम, डॉजक्वाइनमध्ये 5% पेक्षा जास्त घट

निक्कीचा भावनिक आक्रोश: ढसाढसा रडली! अरबाजसाठी म्हणाली, “मी या मुलासाठी…”