डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रेमात मंदाकिनी, दोघांचा ‘तो’ फोटो समोर येताच…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दबदबा फक्त गुन्हेगारी विश्वापुरता मर्यादीत नव्हता,(love)बॉलिवूडमध्येही त्याची दहशत होती. अनेक बॉलिवूड कलाकारांना दाऊद इब्राहिम याने धमकावलं आहे तर, काही अभिनेत्रींना दाऊद इब्राहिम याने स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. अशाच एक अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री मंदाकिनी. मंदाकिनी हिने 80 आणि 90 च्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होते. मंदाकिनी हिचं सौंदर्य आणि निळ्या डोळ्यांच्या प्रेमात अनेक पुरुष होते आणि यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं देखील नाव होतं.

रिपोर्टनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि (love)मंदाकिनी त्याकाळी रिलेशनशिपमध्ये होते. सुरुवातील याबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हतं. पण जेव्हा डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत मंदाकिनी हिचा एक फोटो व्हायरल झाला तेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगू लागली. संपूर्ण देशात फक्त आणि फक्त डॉन दाऊद इब्राहिम – मंदाकिनी यांच्या नात्याची चर्चा होती.

80 आणि 90 च्या दशाकात प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली मंदाकिनी आता 61 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीचा जन्म 30 जुलै 1963 मध्ये झाला होती. सांगायचं झालं तर, तेव्हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं बॉलिवूडवर वर्चस्व होतं. तेव्हाच मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांच्याच प्रेम बहरलं.

मंदाकिनी हिने कधीच दाऊद इब्राहिम याच्यासोबत असलेलं नातं स्वीकारलं नाही. पण 1994 मध्ये समोर आलेल्या त्यांच्या एका फोटोमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. 1994 साली दुबईच्या शारजाहच्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांमध्ये सामना सुरू होता. दाऊद आणि मंदाकिनी सामना पाहण्यासाठी एकत्र आले होते.

स्टेडियममध्ये मंदाकिनी आणि दाऊत एकमेकांच्या बाजूला बसले होते. दोघांचा फोटो तुफान चर्चेत राहिला. पण त्या एका फोटोमुळे मंदाकिनी हिच्या करियरवर फार मोठा आघात झाला. दाऊद इब्राहिम याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे मंदाकिनी हिच्या करियरला ब्रेक लागला. अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर मंदाकिनी अचानक बॉलिवूडपासून दूर झाली.

मंदाकिनी हिने करियरची सुरुवात 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमातून केली. सिनेमात अभिनेत्रीसोबत राज कपूर यांची पूत्र राजीव कपूर होते. सिनेमामुळे एका रात्रीत मंदाकिनी यशाच्या शिखरावर पोहोचली. पण अभिनेत्रीचा लोकप्रियता फार काळ टिकली नाही. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

हेही वाचा :

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलन: शंभरहून अधिक लोकांचा जीव धोक्यात, मोठ्या प्रमाणात हानी

अग्निवीरांच्या कुटुंबियांना 1 कोटींहून अधिक नुकसान भरपाई देणार; राहुल गांधींनी केला मुद्दा उपस्थित..

समित कदम यांच्या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली खळबळ