बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती(health) अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. बीडमधील मेळाव्यात भाषण देताना त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती(health) स्थिर आहे, मात्र पुढील २४ तास त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी आपल्या भाषणादरम्यान उल्लेख केला होता.
आज बीडमध्ये आयोजित मेळाव्यात त्यांनी विशेष उपस्थिती लावली होती. भाषणादरम्यान त्यांना अचानक चक्कर येऊ लागली, मात्र त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. मात्र, चक्कर वाढल्याने ते मंचावर खाली बसूनच भाषण करत राहिले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना भाषण देण्यातही अडचणी येत होत्या. तरीही त्यांनी आपल्या जिद्दीने संपूर्ण भाषण पूर्ण केले. मेळावा संपल्यानंतर आयोजकांनी तातडीने त्यांना बीडमधील रुग्णालयात दाखल केले.या घटनेचे व्हिडीओ समोर आले असून त्यामध्ये जरांगे पाटील यांना उभे राहण्यासही त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

भाषणात बोलताना मनोज जरांगेंनी संतोष देशमुख हत्येसह बीडमधील गुन्हेगारीवरही भाष्य केलं बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. या मेळाव्यात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही उपस्थित होते. व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख या दुर्दैवी घटनेच्या आठवणींनी भावूक झाले. संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम ऐकताना मनोज जरांगे पाटील, धनंजय देशमुख आणि उपस्थित महिला अश्रू अनावर होऊन गहिवरल्या.
बीड शहरात मराठा मेळावा आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, केमिस्ट, वकील, इंजिनिअर आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. भाषणाला सुरुवात केल्यानंतर अचानक जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्यांनी काही काळ भाषण थांबवले. “मला शब्दही फुटत नाहीत,” असे म्हणत त्यांनी काही क्षण विश्रांती घेतली. थोडा वेळ थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केले.
हेही वाचा :
सरकारी बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये तरुणांसाठी मोठी भरती!
रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याचं गुपित उघड? बच्चन म्हणाले, “ती माझी…”
इचलकरंजी शहरात पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात जोरदार निदर्शने; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात नागरिकांचा रोष