मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस : प्रकाश आंबेडकर

“मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे(man). जर त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल”, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते अकोल्यात बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेवर जोरदार टीका केली.

ओबीसी-मराठा आरक्षणाच्या लढाईत (man)सुरु असलेली प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या लाखपुरी गावात पोहोचली यात्रा. दर्यापूरमार्गे ही यात्रा लाखपुरी दाखल झाली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या आरक्षण बचाव यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येतं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि राजकीय नेते आहेत. मात्र, ओबीसींचं आरक्षण वाचवायला कुणीच तयार नसल्यानं त्यासाठी आपण पुढाकार घेतला. मी ही यात्रा काढली नसती तर राज्यात दंगली झाल्या असत्या. आता वातावरण निवळलंय, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता, त्यावरही प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल केलाय. “अशा लोकांवर टाडा लागला पाहिजे. त्यांना कारागृहात टाकून मोकळं व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे, ओडिशामध्ये आहे.

महाराष्ट्रातील माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे, मध्यप्रदेशात आहे. गुजरातमध्ये सुद्धा आहे. त्याचं काय करायचं? समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे. सरकारने हिम्मत दाखवावी असंही सवाल प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी फडणवीसांचा ‘श्रावण प्लान’

रणबीरची EX आलियाला रात्री २ वाजता करायची मेसेज, नंतर झाला पश्चाताप!

अदानी सोडणार समूहाचे अध्यक्षपद, कंपनीची कमान कोण सांभाळणार