विधानसभा निवडणुकीच्या(election) तयारीत राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या पार्श्वभूमीवर भाजपाला एक धक्कादायक इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला.

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांना चेतावणी दिली आहे की, “भाजपाला २०२४ मध्ये सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप तो असणार आहे.” त्यांनी भाजपाचे पदाधिकारी त्यांच्या कडून आलेल्या फसगतांच्या तक्रारींचा संदर्भ घेत भाजपाला चांगला इशारा दिला.
“राज्यातील शेतकरी आणि मराठा समाजासाठी सहनशीलता संपली आहे. लोक विचार करतील की सरकारला काय करायचं ते करुद्या, पण निवडणुकीत भाजपाला पाडायचं,” असं जरांगे यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आहे, त्यामुळे त्यांचाच दोष आहे. त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण रोखलं आहे. हे नाकारून चालणार नाही.”
जरांगे पाटील यांनी भाजपावर छगन भुजबळ यांच्याशी संबंधित आरोप केले असून, फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाची परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
डिसेंबरमध्ये पोलीस भरतीची मोठी लाट: राज्यात साडेसात हजार तर मुंबईत १२०० पदांसाठी संधी
प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल: “खोट्या आरोपांनी फडणवीसांना लक्ष्य करणं चुकीचं”