मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक मैदान सोडले…!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बाहेर उभा राहून भल्या भल्या राजकारण्यांशी(political news today) पंगा घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात उतरण्याचा रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. पुणे, मराठवाड्यात किमान 25 उमेदवार देणार. काही प्रस्थापितांना पाडणार असे सांगणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी निवडणुकीच्या राजकारणातून सपशेल माघार घेतली. त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांचा या निवडणुकीतील सोशल इंजिनियरिंगचा प्रयोगही आता राजकीय मंचावर येण्यापूर्वीच फसला आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पंधरा महिन्यापूर्वी अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षण(political news today) प्रश्न घेऊन आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला होईपर्यंत त्यांचे नाव महाराष्ट्राला माहीतही नव्हते. त्यानंतरच्या सततच्या आंदोलनातून ते रस्त्यावर दिसत राहिले. तेव्हाही समाजकारणातला साधा माणूस अशी त्यांची ओळख होती. गेल्या काही महिन्यांपासून मात्र त्यांच्यातील राजकीय नेतृत्व पुढे आल्यासारखे वाटत होते. सगळेच प्रश्न राजकारणाच्या माध्यमातून सुटत नसतात हे माहीत असूनही त्यांनी राजकारणाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला होता.

विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर मराठा उमेदवार देणार, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रस्थापितांना निवडणुकीत पाडणार असे वारंवार इशारा देणारे मनोज जरांगे पाटील हे रविवारी 25 जागा लढवणार असे सांगू लागले. आणि आता त्यातूनही त्यांनी माघार घेतली आहे. निवडणूक राजकारणातून माघार घेतली असली तरी मराठा आरक्षणासाठी माझा लढा चालूच राहील असे त्यांनी सांगितले आहे.

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. त्यासाठी स्वतंत्र भारत नावाचा पक्ष स्थापन केला. निवडणूक लढवली. त्या आधी ते खासदारही होते. कृषी मूल्य आयोगाची जबाबदारी त्यांच्यावर होती पण तरीही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. शरद जोशी यांच्यापासून प्रेरणा घेऊन महेंद्रसिंह टीकैत हे उत्तर भारतात राजकारणात उतरले होते. त्यांचे सात खासदार होते. पण शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटले नाहीत.

राजू शेट्टी यांनीही स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. एक दोनदा खासदार झाले पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असे काही घडले नाही. अशा आणखी काही संघटनांनी नंतर त्यांच्या संघटनांचे राजकीय पक्षात रूपांतर केले पण त्यांनाही यश प्राप्त झाले नाही. एकूणच राजकारणात राहून प्रश्न सुटत नाहीत हे लक्षात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीचे मैदान सोडले असावे. त्यांच्या सोशल इंजिनियरिंग प्रयोगालाही संबंधितांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसावा.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील(political news today) अनेक जिल्ह्यातील मातब्बर प्रस्थापितांनी जरांगे फॅक्टरचे उपद्रव मूल्य आपणासाठी नको म्हणून त्यांची अंतरवाली सराटी गावी जाऊन भेट घेतली होती. अगदी रविवारी पर्यंत हा भेटीचा सिलसिला सुरूच होता. आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनीच निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांना या निवडणुकीत दिलासा मिळाला आहे.

आपण निवडणुकीचे राजकारण का सोडत आहोत या मागचे त्यांनी सांगितलेले कारण फारसे पटणारे नाही. कारण दलित आणि मुस्लिमाना सोबत घेण्याचा त्यांचा निर्णय हा अलीकडचा आहे. त्याच्यापूर्वी त्यांनी राजकारणात उतरण्याचा विचार अनेकदा बोलून दाखवला होता. मग अचानक त्यांनी मैदान का सोडले? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडा असे आवाहन पडद्यामागे राहून कुणा तरी बड्या नेत्यांने त्यांना केले असावे.
आरक्षण लढ्यातील त्यांचे एक प्रमुख विरोधक ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे मात्र त्याचवेळी आणखी एक ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा :

आई-मावशीच्या रीलच्या वेडापायी गेला चिमुकलीचा जीव; ती बुडत होती, त्या मात्र….

“…घरात ‘लक्ष्मी’ आली”; तेजस्विनी पंडितनं चाहत्यांसोबत शेअर केली Good News

अमेरिकेत आज नव्या राष्ट्राध्यक्षाची निवड, हॅरिस-ट्रम्प यांच्यात लढत