कुणी मारून टाकीन म्हणतो, गोळ्या घालीन म्हणतो…; मनोज जरांगेच्या विधानाने खळबळ

मराठा आरक्षणासाठी(reservation system) मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जालन्यातील अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनातील भीती त्यांनी बोलून दाखवली. अंतरवलीमधून मला हलू देत नाहीत. मी तिथे आंदोलन करतो. कुणी मला मारून टाकीन म्हणतो. कुणी गोळ्या घालीन म्हणतो… सरकार, पोलीस मराठ्यांच्या विरोधात आहे.

सरकार आणि पोलिसांना वाटतं की घातपात झालं पाहिजे. दुसऱ्याचं झालं तर तातडीने(reservation system) कारवाई करून संरक्षण देतं. मात्र आम्हाला मारून टाकू द्या. आमच्याकडे लक्ष देत नाही. पण मी भीत नाही. समोर ये.. कचका दाखवतो. आमचे लई हल आहे. मराठ्यांचा वेगळं हाल आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

कॅबिनेट बैठक आहे का नाही माहित नाही. प्रत्येक वेळी शंका घेऊ नये. आपली तारीख 13 आहे. समाजाला दिलेला शब्द सरकारने पाळावी. ओबीसी मराठा वादाची काय संबंध? ओबीसी आरक्षण असून ते रडत आहेl. आम्हाला तर आरक्षण नाही. त्यामुळे चौपट लढतील. आमचे लोक आता आपसातील भांडण मिटवून एक होतील. मिळू नये म्हणून एक झाली. आम्हाला मिळावं म्हणून एक होणार आहे. मराठ्यांच्या नेत्यांना उघडे डोळे घेऊन बघता का? मदत करणार नाही आमदार- खासदारांना उघडे पडणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ याला मी टार्गेट केलं काही करेल. तुम्हाला अस म्हणायचं का आम्ही एकमेकांना भाऊ म्हणू नये? यासाठी आंदोलन उभे केले का? मी धनगर समाजाला आरक्षण देईल म्हणतो. तरी लोक आमच्या मागे नाही. मी सरकारला अंगावर घ्यायचं ठरवलं अन् तुम्ही लोकांचं एकूण खोटं लढत आहे. धनगर बांधवांच्या अडून हे लढत आहे.मी मात्र ओबीसीमधून घेतल्याशिवाय थांबणार नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न करा. इकडे मराठा आमदार खासदार येतंय. पत्र द्यायला लागले आहे. महाराष्ट्र समाज बघत आहे. जे येत नाही ते विरोधी आहे का? असा प्रश्न पडतो. या एकजुटीचा समाजाला फायदा होईल. अधिवेशन आरक्षणासाठी गाजवत आहे. कोण पत्र घेऊन येत नाही त्यावर लक्ष आहे. आता भागलं मात्र अस वागला. तर पुढची तयारी मराठ्यांनी केली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा :

महायुतीच्या रंगमंचावरचे एक अस्वस्थ पात्र : भुजबळ

दोघात नको तिसरा, आता दादांना विसरा! भाजपमध्ये वाढतंय ‘त्या’ नेत्यांचं बळ

हे सरकार फक्त 6-8 महिने, नोव्हेंबरला मविआचं सरकार सत्तेत आणायचंय; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकलं