मनु भाकर नीरज चोप्राशी लग्न करणार? वडिलांनी अखेर सौडलं मौन

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदकांची कमाई(father) करणारी नेमबाज मनु भाकर आणि तिच्या आईने नुकतीच गोल्डन बॉय नीरज चोप्राची भेट घेतली, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला. अनेकांनी या भेटीतून मनु आणि नीरजच्या लग्नाच्या अफवा पसरवल्या. मात्र, मनु भाकरच्या वडिलांनी या सर्व चर्चांवर स्पष्ट शब्दात भाष्य करत अफवांना पूर्णविराम दिला आहे.

मनु भाकरच्या(father) वडिलांनी स्पष्ट केलं की, “मनु अद्याप खूप लहान आहे आणि तिच्या लग्नाचा कोणताही विचार नाही.” त्यांनी असेही सांगितले की मनुची आई नीरजला आपल्या मुलाप्रमाणे मानते, त्यामुळे दोघांमध्ये एक चांगलं नातं आहे, परंतु कोणताही रोमँटिक अँगल नाही.

नीरजच्या काकांनीही त्याच्या लग्नाच्या चर्चांवर आपलं मत व्यक्त करत स्पष्ट केलं की, “नीरजचं लग्न संपूर्ण देशाला कळेल तेव्हा त्याचं सगळ्यांना समजेल.” दोन्ही खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी गौरवशाली कामगिरी करत असून, मनुने दोन कांस्यपदकं जिंकली तर नीरजने रौप्यपदक मिळवलं आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर शहर हद्द वाढ दादा म्हणतात, होणे नाही!

राजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई

‘मी जेव्हा जेव्हा संसदेत बोलते तेव्हा पतीला आयकरची नोटीस’; सुप्रिया सुळे टार्गेट